पपई हे फळ मूळचे दक्षिण मेक्सिकोमधील असून, नंतर त्याचा प्रसार भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, ब्राझील अशा अनेक देशांमध्ये झाला. पपईमध्ये प्रथिने, खनिजे, ‘अ’, ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. पपई जशी पिकते तसं तिच्यामधलं ‘क’ जीवनसत्त्व वाढतं.

पिस्ता, शेंगदाणे खाणे स्मरणशक्तीसाठी उपयुक्त!

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी

पपई ही जेवणानंतर खाणं नेहमीच अधिक फायदेशीर ठरते. कारण पपईमुळे जेवण पचण्यास मदत होते. त्यातून मांसाहार असेल तर जेवण उरकल्यानंतर पपई आवर्जून खावी. मांसाहार हा पचायला जड असतो. मांसाहार पचण्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणूनच मांसाहार पचण्यासाठी पिकलेली पपई खावी. त्याचप्रमाणे पचनशक्ती वाढवण्यासाठीही पपई मदत करते, त्यामुळे भूक मंदावली असेल तर कच्च्या पपईची भाजी खाल्ल्यास पचनशक्ती वाढते. पपईमधील ‘पेपेन’मुळे अपचन, आम्लपित्त, बद्धकोष्ठता हे पोटाचे विकार दूर होतात. त्यातून पिकलेल्या पपईमध्ये फळशर्करा असते जी रक्तामध्ये लगेच शोषली गेल्याने ऊर्जा आणि उत्साहही वाढतो.

‘हे’ आहेत सूर्यफुलाच्या बिया खाण्याचे फायदे

फक्त पोटाच्या तक्रारीसाठीच नाही तर सौंदर्य वाढीसाठीही पपई फायदेशीर आहे. कच्च्या पपईचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर चकाकी येऊन पुटकुळ्या, मुरुमे, सुरकुत्या नाहीशा होतात. त्वचा कोरडी आणि सुरकुतलेली असेल, उन्हामुळे त्वचेवर पुटकुळ्या आल्या असतील व त्यामुळे त्वचेची आग होत असेल तर पपईचा रस त्वचेवर लावावा यामुळे दाह नाहीसा होऊन त्वचा नितळ होते.

सौंदर्य खुलवण्यासाठी रोज वापरा गुलाबपाणी