भारत-चीनमध्ये सीमेवर सुरू असलेल्या संघर्षामुळे देशात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरत आहे. याचा फटका आता TikTok, Helo, Likee आणि PubG यांसारख्या चिनी अ‍ॅप्सना बसल्याचं समोर आलं आहे.

SensorTower च्या रिपोर्टनुसार, लाइव्ह स्ट्रीमिंग अ‍ॅप बिगो लाइव्ह, शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप लाइकी आणि गेमिंग अ‍ॅप पब्जीच्या डाउनलोडींगमध्ये जून महिन्यात घट झाली. तर, टिकटॉक आणि हेलो अ‍ॅपच्या डाउनलोडींगच्या प्रमाणात एप्रिल महिन्यापासून घट होत आहे. टिकटॉक आणि हेलोची मालकी असलेल्या ByteDance ला याचा मोठा फटका बसलाय.

भारतात चिनी इंटरनेट कंपन्यांचे जवळपास 300 मिलियन युनीक युजर्स आहेत. तर, साधारण 450 मिलियन स्मार्टफोन वापरकर्ते भारतात आहेत. म्हणजे भारतात जवळपास दोन तृतियांश युजर्सकडे किमान एकतरी चिनी अ‍ॅप आहे. चिनी अ‍ॅप्स कंपन्यांसाठी भारत मोठं मार्केट आहे, पण सध्या सुरू असलेल्या बहिष्कार मोहिमेचा मोठा फटका त्यांना बसताना दिसत आहे. एक नजर मारुया SensorTower च्या आकडेवारीवर :

TikTok: (मे ते 22 जूनपर्यंत 38 टक्के घट): एप्रिलमध्ये 2.35 कोटी, मेमध्ये 2.24 कोटी, तर जूनमध्ये (1 जून ते 22 जून) 1.39 कोटी डाउनलोड्स.

Helo: (मे ते 22 जूनपर्यंत 38 टक्के घट): एप्रिलमध्ये1.66 कोटी, मेमध्ये 1.49 कोटी, तर जूनमध्ये (1 जून ते 22 जून ) 92 लाख डाउनलोड्स.

Bigo Live: एप्रिलमध्ये 25 लाख, मेमध्ये 26 लाख, तर जूनमध्ये (1 जून ते 22 जून) 18 लाख डाउनलोड्स.

Likee: एप्रिलमध्ये 67 लाख, मेमध्ये 70 लाख, तर जूनमध्ये (1 जून ते 22 जून ) 43 लाख डाउनलोड्स.

PUBG: एप्रिलमध्ये 99 लाख, मेमध्ये 1.22 कोटी, तर जूनमध्ये (1 जून ते 22 जून) 66 लाख डाउनलोड्स.