28 January 2021

News Flash

गेमर्ससाठी संधी! POCO X2 स्मार्टफोनचा आज सेल, ‘या’ आहेत ऑफर

सहा कॅमेरे आणि खास गेमिंगसाठी डिझाइन केलेला दमदार स्मार्टफोन

भारतात गेल्या महिन्यात Poco X2 हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला. आज(दि.३) या फोनच्या विक्रीसाठी विशेष सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. ई-कॉमर्स संकेतस्थळ फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजेपासून या फोनच्या सेलला सुरुवात होईल. Poco X2 स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर असून हा फोन खास गेमिंगसाठी डिझाइन करण्यात आला आहे. दमदार प्रोसेसरशिवाय 6.67 इंच फुल एचडी+ रिअलिटी फ्लो 120Hz डिस्प्लेमुळे गेमिंगचा दर्जेदार अनुभव मिळतो. फोनच्या 3D कर्व्ड बॅक डिझाइनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. Poco X2 भारतात तीन व्हेरिअंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

फीचर्स आणि ऑफर्स –
सेलमध्ये या फोनच्या खरेदीवर काही आकर्षक ऑफरही आहेत. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास एक हजार रुपये इंस्टंट डिस्काउंटची ऑफर आहे. याशिवाय ईएमआय व्यवहाराचाही पर्याय उपलब्ध असेल. अँड्रॉइड 10 ओएसवर कार्यरत असलेल्या या फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर Adreno 618 GPU आणि 8 जीबीपर्यंत LPDDR4X रॅम आहे. पोकोचा हा स्मार्टफोन रिअर क्वॉड कॅमेरा सेटअपसोबत येतो. यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आहे, तर 2 +8 +2 मेगापिक्सलचे अन्य तीन सेंसर आहेत. स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप असून यातील 20 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर आहे. कनेक्टिव्हिटीसाठी युएसबी टाइप-सी पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि आयआर ब्लास्टर आहे. या फोनला लेटेस्ट अँड्रॉइड 11 चे अपडेटही मिळेल असंही कंपनीने स्पष्ट केले आहे. याशिवाय 4,500mAh ची बॅटरी फोनमध्ये असून 68 मिनिटांमध्ये 0 ते 100 टक्के चार्ज होते असा कंपनीचा दावा आहे. अ‍ॅटलांटिस ब्लू, मॅट्रिक्स पर्पल आणि फीनिक्स रेड या तीन रंगांचे पर्यायटलांटिस ब्लू, मॅट्रिक्स पर्पल आणि फीनिक्स रेड या तीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असेल.

किंमत –
या फोनच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 15 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची आहे. तर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये आहे. याशिवाय टॉप व्हेरिअंट म्हणजे 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 19 हजार 999 रुपये आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 10:28 am

Web Title: poxo x2 goes on sale today via flipkart know price offers specifications and all other details sas 89
Next Stories
1 राज ठाकरेंचं भाकित खरं ठरलं? मोदींच्या ‘त्या’ ट्वीटनंतर व्हायरल झाली पोस्ट
2 अमृता फडणवीस यांनीही दिले सोशल मीडिया सोडण्याचे संकेत
3 सोशल मीडियाला रामराम करण्याचा विचार- पंतप्रधान नरेंद्र मोदी
Just Now!
X