News Flash

केसात कोंडा होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय

१० वर्षांच्या मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत कोणाच्याही डोक्यामध्ये कोंडा होऊ शकतो.

केसांमध्ये कोंडा होणं ही अगदी सर्रास होणारी तक्रार आहे. अगदी १० वर्षांच्या मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत कोणाच्याही डोक्यामध्ये कोंडा होऊ शकतो. या कोंड्यापासून सुटका मिळविण्यासाठी सध्या बाजारामध्ये विविध प्रकारचे शॅम्पू, तेल किंवा हेअर कंडिशनर उपलब्ध आहेत. मात्र अनेक वेळा या साऱ्याचा वापर केल्यानंतरही केसातील कोंडा काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही. अशा वेळी काही घरगुती पर्यायांचा वापर केला तर त्याचा नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो.
केसांमध्ये कोंडा होण्याची कारणे –
१.बुरशीचा संसर्ग –
डोक्यावरची त्वचा सतत ओलसर राहिली तर त्वचेला बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. यामुळे केसांत कोंडा होतो.

२.अ‍ॅलर्जी –
अनेक वेळा तरुणी वेगवेगळे शॅम्पू, तेल किंवा साबण यांचा वापर करत असतात. मात्र सतत ब्रॅण्ड बदलत राहिल्यामुळे त्याची अॅलर्जी होऊ शकते. त्याप्रमाणेच प्रदूषणातील काही घटकांमुळेही अॅलर्जी होऊ शकते. परिणामा, केसात कोंडा होऊ शकतो.

३.केसांमधील उवा –
केसांत उवा झाल्या असतील तरी कोंडा होऊ शकतो. उवांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या घटकांमुळे डोक्यावरच्या त्वचेचे आरोग्य धोक्यात येते.

कोंडा घालविण्यासाठी हे उपाय करा –

१. मेथीचे दाणे –
केसात कोंडा झाल्यानंतर मेथीच्या दाण्यांची पेस्ट करावी. ही पेस्ट केसांच्या मुळांशी लावावी आणि काही वेळानंतर ती धुवून टाकावी. असं केल्यानंतर कोंड्याचे प्रमाण कमी होते.

२. सिताफळाच्या बिया –
सिताफळ हे अत्यंत गुणकारी फळ असून या फळाप्रमाणेच त्याच्या बियाही तितक्याच गुणकारी आहेत. सिताफळाच्या बियांचे चूर्ण करुन ही पेस्ट रोज अर्धा तास केसांच्या मुळाशी लावावी. त्यानंतर ती धुवून टाकवी.

३. खोबऱ्याचं तेल आणि भीमसेनी कापूर –
गरम केलेल्या खोबरेल तेलात भीमसेनी कापूर घालावा आणि हे तेल गार करून त्याने केसांना मालिश करावी.

४. तमालपत्र –
तमालपत्राची (तेजपान) ७-८ पाने एक कप पाण्यात उकळून घेऊन त्या पाण्याने केस धुवावेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2019 5:27 pm

Web Title: problem of hair dandruff ssj 93
Next Stories
1 ‘तळवलकर्स’शी भागीदारी, युरोपातील प्रख्यात ‘डेव्हिड लॉइड क्लब’ भारतात दाखल; पुण्यातून सुरूवात
2 सोन्याची मागणी तीन वर्षांच्या उच्चांकावर
3 येतोय नवा ‘जिओ’ फोन, काय आहे खासियत ?
Just Now!
X