News Flash

भारतात PUBG Mobile चं पुनरागमन?, गेमप्रेमींसाठी आली खूशखबर

सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाला?

(संग्रहित छायाचित्र)

PUBG Mobile हा लोकप्रिय ऑनलाइन बॅटल रॉयल गेम भारतात बॅन झाल्यापासून हा गेम पुन्हा लाँच होणार असल्याच्या अनेक बातम्या सतत येत आहेत. अशातच आता भारतात हा गेम लवकरच पुन्हा लाँच होणार असल्याचं वृत्त आलंय. भारत सरकार किंवा कंपनीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण, दोन युट्यूबर्सनी हा दावा केला आहे. GodNixon आणि TSM Ghatak नावाच्या दोन युट्यूबर्सनी PUBG Mobile साठी सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाला असून लवकरच चांगली बातमी मिळेल, असं म्हटलंय. PUBG Mobile ची पॅरेंट कंपनी Krafton ला भारत सरकारकडून परवानगी मिळाल्याचा दावा या दोघांनी केला आहे.

GodNixon ने आपल्या युट्यूब चॅनलवर सांगितलं की, भारत सरकारने PUBG ला भारतात लाँच करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. मात्र नेमक्या कोणत्या तारखेला गेम भारतात पुन्हा लाँच होणार याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नसल्याचं म्हटलं. पण भारतात गेमचं पुनरागमन होणार हे नक्की असल्याचं त्याने सांगितलं. तर, TSM Ghatak सह अनेक क्रिएटर्सनीही याबाबत स्टोरी पोस्ट केली आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये PUBG Mobile प्रेमींना आनंदाची बातमी भेटेल असा दावा TSM Ghatak ने केलाय. पुढील दोन महिन्यात PUBG प्रेमींसाठी आनंदाची बातमी मिळेल, कृपया तारीख विचारु नका असं TSM Ghatak म्हणाला. याबाबतचा खुलासा करायचा नव्हता पण स्वतःवर कंट्रोल देखील करता येत नाहीये असंही त्याने व्हिडिओमध्ये सांगितलं.

तसं बघायला गेलं तर अशाप्रकारचे अनेक दावे बऱ्याचदा करण्यात आले. पण अद्याप गेमचं भारतात पुनरागमन झालेलं नाही. शिवाय सरकारकडूनही याबाबत कोणती माहिती देण्यात आलेली नाही. पण काही दिवसांपूर्वी Krafton कंपनी PUBG मोबाइल इंडिया बनवण्यासाठी कठोर मेहनत घेत असल्याचं वृत्त आलं होतं. आम्ही वेळ किंवा अन्य सविस्तर माहिती देऊ शकत नाही, पण आम्हाला भारतीय बाजारात पुनरागमन करायचं आहे, त्यासाठी आम्ही खूप मेहनत घेत आहोत असं कंपनीने म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 1:59 pm

Web Title: pubg mobile game may soon be relaunched in india claims two youtubers sas 89
Next Stories
1 स्वस्तात Redmi Note 10 Pro खरेदीची संधी, ‘फ्लॅश सेल’मध्ये शानदार ऑफर
2 मूत्रपिंड विकार आणि करोना
3 मनोमनी : मनोशारीरिक आजार
Just Now!
X