सध्याच्या स्मार्टफोनच्या जमान्यात दररोज नवनवीन आणि मनोरंजक व्हिडिओ गेम येतायेत. मात्र, गेम लव्हर्स आजही एकेकाळचा सर्वाधिक लोकप्रिय गेम सुपर मारियोला (Super Mario)विसरलेले दिसत नाहीत.

सुपर मारियो गेमच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरुन लावता येऊ शकतो की, वर्ष 2017 मध्ये कंपनी निनटेंडोने (Nintendo) व्हर्जन सुपर मारियो ओडेसी (Super Mario Odyssey) लाँच केला होता, आणि लाँच होताच हा गेम सुपरहिट ठरला होता. आता गेल्या आठवड्यातच सुपर मारियो ब्रोस-3 (Super Mario Bros-3) ची दुर्मिळ सील्ड कॉपी तब्बल दीड कोटी रुपयांना विकल्याचं समोर आलं आहे. ‘हेरिटेज ऑक्शन’कडून या गेमच्या कॉपीचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. गेमच्या कॉपीची दीड कोटी रुपयांना झालेली विक्री वर्ल्ड रेकॉर्ड असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे हा जगातील सर्वाधिक महागडा व्हिडिओ गेम ठरला आहे.

20 नोव्हेंबर रोजी सुपर मारियो ब्रोस-3 च्या कॉपीचा लिलाव 1,56,000 डॉलरमध्ये झाला. यापूर्वी गेमच्या आधीच्या कॉपीचा लिलाव 1,14,000 डॉलरमध्ये झाला होता. कंपनीने याबाबतीत स्वतःचाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडलाय. रिपोर्ट्सनुसार, लिलावामध्ये 20 कंपन्यांनी गेमची कॉपी खरेदी करण्यासाठी सहभाग घेतला होता. दुर्मिळ पॅकेजिंगमुळे गेमच्या कॉपीची किंमत जास्त राहिली असं, हेरिटेज ऑक्शनने म्हटलंय.

हा गेम 1981 मध्ये लाँच करण्यात आला होता. गेममधील ‘डॉन्की कॉन्ग’ हे कॅरेक्टर जपानचे डिझाइनर शिगुरे मियामोटो यांनी डिझाइन केलं होतं.