चीनची कंपनी Realme ने भारतात आपले दोन नवे स्मार्टफोन Realme 5 Pro आणि Realme 5 लाँच केले आहेत. नवी दिल्लीत आयोजित एका इव्हेंटमध्ये कंपनीने मागील बाजूला चार कॅमेरे असलेले हे दोन्ही स्मार्टफोन लाँच केले. कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन सर्वप्रथम भारतीय बाजारात लाँच केले आहेत.

Realme 5 Pro किंमत –
Realme 5 Pro या स्मार्टफोनची किंमत 13 हजार 999 रुपयांपासून सुरू होते. ही किंमत 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची आहे. Realme 5 Pro च्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 14 हजार 999 रुपये आहे. तर, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजच्या व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये आहे.

Realme 5 Pro चे फीचर्स –
या स्मार्टफोनमध्ये 6.3 इंच FHD+ ड्यूड्रॉप फुल स्क्रीन आहे. मागील बाजूला चार कॅमेरे असून त्यातील एक 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. याशिवाय एक कॅमेरा 8 मेगापिक्सल आणि अन्य दोन कॅमेरे 2 मेगापिक्सलचे आहेत. सेल्फीसाठी पुढील बाजूला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 712 प्रोसेसर आहे. Realme 5 Pro स्पार्कलिंग ब्ल्यू, क्रिस्टल ग्रीन अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. या स्मार्टफोनमध्ये 4,035 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनच्या विक्रीसाठी 4 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेपासून फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर सेल आयोजित करण्यात आला आहे.

Realme 5 फीचर्स –
कंपनीने Realme 5 स्मार्टफोन क्रिस्टल डिझाइनसह आणला आहे. हा स्मार्टफोन क्रिस्टल ब्ल्यू आणि क्रिस्टल पर्पल या रंगांमध्ये उपलब्ध असून या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच स्क्रीन आहे. याच्या मागील बाजूलाही चार कॅमेरे आहेत. यातील 12 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असून दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. तर अन्य दोन कॅमेरे 2 मेगापिक्सलचे आहेत. सेल्फीसाठी यामध्ये 13 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh क्षमतेची पावरफुल बॅटरी असून क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर देण्यात आलं आहे.

Realme 5 किंमत –
या फोनची किंमत 9 हजार 999 (3 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेज) रुपयांपासून सुरू होते. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजवाल्या रिअलमी 5 ची किंमत 10 हजार 999 रुपये आहे. 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 11 हजार 999 रुपये आहे. या फोनच्या विक्रीसाठी 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेपासून फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर सेल आयोजित करण्यात आला आहे.