रिअलमी (Realme) कंपनीने आपला बजेट फोन Realme C3 च्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. फेब्रुवारीमध्ये लॉन्च झाल्यापासून कंपनीने दुसऱ्यांदा या फोनच्या किंमतीत वाढ केली आहे. हा फोन म्हणजे रिअलमी C2ची पुढील आवृत्ती आहे.

किंमतीत वाढ झाल्याने Realme C3 च्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची नवीन किंमत आता 7,999 रुपये झाली आहे. Flipkart आणि Realme च्या संकेतस्थळावर नवीन किंमत अपडेट करण्यात आली आहे. यापूर्वी जीएसटी दरांमध्ये वाढ झाल्यामुळे या मॉडेलची किंमत 6,999 रुपयांहून 7,499 रुपये झाली होती. आता पुन्हा 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय Realme C3 च्या 4 जीबी + 64 जीबी मॉडेलची किंमत आता 8,999 रुपये झाली आहे. या मॉडेलच्या किंमतीतही 500 रुपयांची वाढ झाली आहे.

आणखी वाचा- Realme च्या ‘या’ फोनचा पहिलाच सेल…फक्त तीन मिनिटात विकले 70 हजार स्मार्टफोन

फीचर्स –
हा फोन दोन व्हेरिअंटमध्ये (3GB रॅम + 32GB स्टोरेज आणि 4GB रॅम +64GB स्टोरेज) उपलब्ध आहे. ड्युअल रिअर कॅमेरा, MediaTek Helio G70 प्रोसेसर असलेल्या या एंट्री लेवलच्या फोनमध्ये इनबिल्ट डार्क मोड आणि रिव्हर्स चार्जिंग यांसारखे फीचर्सही आहेत. रिअलमी UIसोबत अँड्रॉइड 10 वर आधारित असलेला हा कंपनीचा पहिलाच स्मार्टफोन आहे. हा फोन केवळ Android 10 ऑपरेटिंग सिस्टिमसोबत येतो असं नाही, तर यामध्ये MediaTek Helio G70 प्रोसेसरही आहे. फोनमध्ये इनबिल्ट डार्क मोड आहे. या फोनमध्ये 6.5 इंचाचा वॉटर-ड्रॉप स्टाइल नॉच डिस्प्ले असून कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन आहे. यात ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G70 एसओसी प्रोसेसर मिळतं. 32जीबी/64जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या फोनमध्ये 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी असून रिव्हर्स चार्जिंग फीचरही आहे. फोटोग्राफीसाठी मागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप (12 + 2 MP) देण्यात आलाय, तर सेल्फीसाठी 5 मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा आहे.