रिअलमी कंपनीच्या वेबसाइटवर (realme.com) ‘रिअलमी डेज सेल’ सुरू आहे. २६ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या सेलचा आज अखेरचा दिवस आहे. या सेलमध्ये कंपनीच्या अनेक प्रोडक्ट्सवर डिस्काउंट आणि विविध आकर्षक ऑफर्स आहेत. सेलमध्ये Realme 6 हा स्मार्टफोनदेखील डिस्काउंटसह खरेदी करता येईल.

Realme 6 डिस्काउंट :-
‘रिअलमी डेज सेल’मध्ये Realme 6 या स्मार्टफोनवर दोन हजार रुपयांची सवलत मिळेल. त्यामुळे हा फोन ग्राहकांना 13 हजार 999 रुपयांऐवजी 11 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ही किंमत फोनच्या बेसिक व्हेरिअंटची (4GB+64GB) आहे. अशाचप्रकारे 6GB+64GB व्हेरिअंट 12 हजार 999 रुपयांत, 6GB+128GB व्हेरिअंट 13 हजार 999 रुपयांत आणि 8GB+128GB व्हेरिअंट 14 हजार 999 रुपयांत खरेदी करता येईल.

आणखी वाचा- 2000 रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा जबरदस्त स्मार्टफोन, मिळेल पाच कॅमेऱ्यांसह 6GB रॅम + 5,000mAh बॅटरी

Realme 6 फीचर्स :–
एकूण पाच कॅमेरे असलेला हा स्मार्टफोन Comet White आणि Comet Blue या दोन कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये 6.5 इंच पंच-होल डिस्प्ले असून यात MediaTek Helio G90T प्रोसेसर दिले आहे. Realme 6 च्या मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सल पोर्ट्रेट लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स आहे. तर, सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा आहे. या कॅमेऱ्याला AI ब्युटी मोड, पोर्ट्रेट मोड, HDR सेल्फी मोड दिले आहेत. Realme 6 मध्ये 4,300 mAh ची बॅटरी आणि 30W फ्लॅश चार्जर असून एका तासात बॅटरी पूर्ण चार्ज होते असा कंपनीचा दावा आहे.