शाओमी (Xiaomi) कंपनीने भारतात आपला स्वस्त स्मार्टफोन Redmi 7A लाँच केला आहे. 5 हजार 999 रुपये इतकी या स्मार्टफोनची बेसिक किंमत आहे. मे महिन्यात हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. मागच्याच वर्षी बाजारात आलेल्या ‘रेडमी 6 ए’ ची ही अद्ययावत आवृत्ती असल्याचं बोललं जात आहे. शाओमीच्या ‘रेडमी नोट 7’ स्मार्टफोन सिरीजला भारतात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सध्या कंपनी ‘के 20’ ही नवीन सिरीज भारतात लॉच करण्याच्या तयारीत आहे. मात्र त्याआधीच कंपनीने ‘रेडमी 7 ए’ हा नवा फोन लाँच केला आहे. दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.

या फोनच्या  2GB रॅम +16GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 5 हजार 999 रुपये आहे  तर, 2GB रॅम +32GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत  6 हजार 199 रुपये आहे. हा स्मार्टफोन 11 जुलैपासून फ्लिपकार्ट आणि शाओमीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन खरेदी करता येईल. ‘स्मार्ट देश का स्मार्टफोन’ अशी टॅगलाइन कंपनीने या स्मार्टफोनसाठी वापरली आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूला असलेल्या कॅमेऱ्यात Sony IMX486 सेंसर आहे.

भारतातील पाच वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त  कंपनी Redmi 7A स्मार्टफोनवर स्पेशल ऑफर देत आहे. या अंतर्गत जुलै महिन्यात Redmi 7A खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 200 रुपयांची सवलत मिळेल. म्हणजे, 2GB रॅम +16GB स्टोरेजचं व्हेरिअंट 5 हजार 799 रुपयांमध्ये, तर 2GB रॅम +32GB स्टोरेजचं व्हेरिअंट 5 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल नॅनो-सिम स्लॉट आहे. यामध्ये 3.5 mm हेडफोन जॅक असून हा फोन ब्ल्युटूथ 5.0 ला सपोर्ट करतो.

रेडमी 7 ए फीचर्स –

डिस्प्ले – 5.45 इंचाचा 720X1440 पिक्सल रिसोल्यूशन

1.4 जीएचझेड ऑक्टो कोर प्रोसेसर

बॅटरी –  4 हजार एमएएमच क्षमतेची बॅटरी

ओएस – लेटेस्ट  अँड्रॉइड 9.० पाय

कॅमेरा – 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

व्हेरिअंट –  2 जीबी रॅम, 16 जीबी मेमरी आणि 2 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेज (मायक्रोएसडीकार्डने मेमरी 256 जीबीपर्यंत वाढवली जाऊ शकते)