News Flash

Redmi K20 Pro चा जलवा, पहिल्याच सेलमध्ये 2 लाखांहून जास्त फोनची विक्री

10 वाजेपासून सेल सुरू झाला होता आणि साडे अकरा वाजेपर्यंत अर्थात अवघ्या दीड तासांमध्ये स्टॉक संपला

Xiaomi ची सब ब्रँड कंपनी Redmi ने काही दिवसांपूर्वीच आपला Redmi K20 Pro हा स्मार्टफोन चिनमध्ये लाँच केला होता. OnePlus 7 Pro आणि सॅमसंग Galaxy S10 या स्मार्टफोनशी K20 Pro ची टक्कर असणार आहे. भारतात हा स्मार्टफोन Poco F2 Pro या नावाने लाँच केला जाण्याची शक्यता आहे. चिनमध्ये लाँचिंगनंतर या स्मार्टफोनसाठी पहिला सेल आयोजित करण्यात आला होता, यावेळी ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

चीनमधील ‘वीबो’ या संकेतस्थळावर जारी करण्यात आलेल्या एका पोस्टरनुसार पहिल्याच सेलमध्ये या स्मार्टफोनच्या 2 लाखांहून जास्त युनिट्सची विक्री झाली. केवळ दोन तासांच्या आत एवढा मोठा प्रतिसाद मिळाला. 10 वाजेपासून सेल सुरू झाला होता आणि साडे अकरा वाजेपर्यंत अर्थात अवघ्या दीड तासांमध्ये स्टॉक संपला. चीनमध्ये 4 जून रोजी या स्मार्टफोनसाठी पुढील सेल आयोजित करण्यात आला आहे.

Redmi K20 आणि Redmi K20 Pro हे दोन स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारातही लाँच केले जातील, असं शाओमी इंडियाने स्पष्ट केलं आहे. Poco F2 आणि Poco F2 Pro या नावाने हे स्मार्टफोन भारतात लाँच केले जाण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत हे स्मार्टफोन भारतात लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून अद्याप नेमकी तारीख समोर आलेली नाही. Redmi K20 च्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 1999 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास 20 हजार रुपये आहे. तर Redmi K20 Pro च्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 2499 युआन म्हणजे भारतीय चलनानुसार जवळपास 25 हजार रुपये आहे. याशिवाय 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत अनुक्रमे 28 हजार रुपये आणि 30 हजार रुपये आहे. Redmi K20 मध्ये स्नॅपड्रॅगन 710 आणि Redmi K20 Pro मध्ये फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 1:22 pm

Web Title: redmi k20 pro first sale in china
Next Stories
1 अमेरिकेचा व्हिसा हवाय? सोशल मीडिया खात्यांची माहिती देणं बंधनकारक
2 Apple ची लोकप्रिय iTunes सर्विस होणार बंद, 18 वर्षांचा प्रवास संपणार!
3 वृद्धत्वाच्या उंबरठय़ावर योगाभ्यास फायदेशीर
Just Now!
X