09 August 2020

News Flash

64MP चा शानदार कॅमेरा, Redmi Note 8 Pro चा आज फ्लॅशसेल

गामा ग्रीन, हॅलो व्हाइट आणि शॅडो ब्लॅक अशा तीन कलर्समध्ये उपलब्ध

शाओमीचा 64 मेगापिक्सल क्षमतेचा दमदार कॅमेरा असलेला स्मार्टफोन Redmi Note 8 Pro आज (दि.11) पुन्हा एकदा खरेदी करण्याची संधी आहे. या फोनच्या विक्रीसाठी आज  शाओमीच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर विशेष सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. आतापर्यंतच्या सर्व सेलमध्ये भरघोस प्रतिसाद मिळाल्याने काही मिनिटांमध्येच हा फोन ‘आउट ऑफ स्टॉक’ होतोय. दुपारी १२ वाजेपासून हा सेल सुरू होईल.

शाओमीने तीन महिन्यापूर्वी भारतात रेडमी नोट 8 सीरिज अंतर्गत रेडमी नोट 8 (Redmi Note 8) आणि रेडमी नोट 8 प्रो (Redmi Note 8 Pro) हे दोन फोन कंपनीने लाँच केले होते. या सीरिजच्या फोन्सची आतापर्यंत 1 कोटीहून अधिक विक्री झाल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. नोट 8 सीरिजला भारतात उदंड प्रतिसाद मिळत असून सरासरी प्रमाणे दिवसाला 110000 युनिटची विक्री होत असल्याची माहिती कंपनीने दिलीये.

Redmi Note 8 Pro फीचर्स –
या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूला 64MP क्षमतेचा सॅमसंग ISOCELL Bright GW1 कॅमेरा असून अन्य तीन कॅमेरे 8MP+2MP+2MP क्षमतेचे आहेत. याशिवाय फोनमध्ये सेल्फीसाठी 20MP क्षमतेचा कॅमेराही आहे. स्लो-मोशन व्हिडिओ रेकॉर्डिंगचं फीचर यामध्ये आहे. 4500 mAh क्षमतेची पावरफुल बॅटरी यात देण्यात आली आहे. गामा ग्रीन, हॅलो व्हाइट आणि शॅडो ब्लॅक अशा तीन कलर्समध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे. यात 6.53 इंचाचा डिस्प्ले असून यात 3D कर्व्ह्ड गोरिला ग्लासचा 5 पॅनलचा वापर करण्यात आला आहे. 6GB रॅम + 64GB स्टोरेज, 6GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 128GB स्टोरेज अशा तीन विविध व्हेरिअंट्समध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. मीडियाटेक हेलियो G90T chipset चा सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन MIUI 10 Android 9 Pi वर कार्यरत असेल. उत्तम गेमिंग अनुभवासाठी यामध्ये लिक्विड कूलिंग सपोर्ट आहे, याद्वारे गेम खेळताना कोणत्याही समस्येशिवाय दर्जेदार अनुभव मिळेल असा कंपनीचा दावा आहे.

किंमत –
6GB रॅम + 64GB स्टोरेज – 14 हजार 999 रुपये,
6GB RAM + 128GB स्टोरेज – 15 हजार 999 रुपये
8GB RAM + 128GB स्टोरेज – 17 हजार 999 रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 10:27 am

Web Title: redmi note 8 pro goes on sale via amazon and mi website know price and all specifications sas 89
Next Stories
1 नुसरत जहाँ यांनी इन्स्टाग्रामवर तो फोटो पोस्ट केला आणि…
2 आता नाही विसरणार कोणतंच काम, Whatsapp देईल आठवण
3 “किती कंजूस आहेस रे तू, संपूर्ण रात्र…;” संतापलेल्या चोराने घरमालकासाठी सोडली चिठ्ठी
Just Now!
X