News Flash

48MP कॅमेऱ्यासह 5,000mAh ची दमदार बॅटरी, Redmi Note 9 Pro खरेदी करण्याची पुन्हा संधी

एअरटेलच्या ग्राहकांना डबल डेटा बेनिफिटची ऑफर

Xiaomi चा शानदार स्मार्टफोन Redmi Note 9 Pro आज(दि.14) पुन्हा एकदा खरेदी करण्याची संधी आहे. या फोनच्या विक्रीसाठी कंपनीने फ्लॅश सेलचं आयोजन केलं आहे. मार्च महिन्यामध्ये लाँच झाल्यापासून तीन महिने उलटले , तरीही हा फोन अद्याप फ्लॅश सेलमध्येच उपलब्ध होत आहे. Mi.कॉम आणि अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर हा सेल दुपारी 12 वाजेपासून सुरू होत असून या फोनच्या खरेदीवर सेलमध्ये आकर्षक ऑफरही आहे. कंपनीने मार्चमध्ये Redmi Note 9 Pro आणि Redmi Note 9 Pro Max हे दोन फोन लाँच केले होते.

ऑफर्स :-
Redmi Note 9 Pro हा फोन सेलमध्ये खरेदी केल्यास एअरटेलच्या ग्राहकांना डबल डेटा बेनिफिटची ऑफर आहे. 298 आणि 398 रुपयांच्या प्लॅनवर ही ऑफर मिळेल. नो-कॉस्ट ईएमआय आणि स्टँडर्ड ईएमआयचा पर्यायही ग्राहकांना मिळेल.  या फोनमध्ये मागील बाजूला 48MP प्रायमरी सेन्सरसह चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. तर, सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असून 5,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.

रेडमी नोट 9 प्रो स्पेसिफिकेशन्स : दोन व्हेरिअंटमध्ये भारतीय बाजारात आलेला Redmi Note 9 Pro ऑरोरा ब्लू, ग्लेशिअर व्हाइट, आणि इंटरस्टेलर ब्लॅक अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. रेडमी नोट 9 प्रोमध्ये 6.67-इंच फुल-एचडी+ IPS डिस्प्ले असून कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 वर कार्यरत असून यात लेटेस्ट MIUI व्हर्जन देण्यात आलंय. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर आहे. याशिवाय क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, 8 मेगापिक्सलचा सेकंडरी अल्ट्रा-वाइड सेंसर, मॅक्रो लेंससोबत 5 मेगापिक्सलचा तीसरा सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा चौथा सेंसर आहे. तर, सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,020mAh क्षमतेची दमदार बॅटरी फोनमध्ये आहे. रेडमी नोट 9 प्रो मॅक्सप्रमाणे या फोनमध्येही NavIC सपोर्ट आहे. NavIC हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने(ISRO)विकसीत केलेले तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे जीपीएससाठी ‘मेड इन इंडिया’ पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. जीपीएसच्या तुलनेत NavIC अत्यंत अचूक माहिती देईल, असा ISRO चा दावा आहे.

किंमत : रेडमी नोट 9 प्रो (4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 13 हजार 999 रुपये आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 11:55 am

Web Title: redmi note 9 pro go on sale get price specifications offers and other details sas 89
Next Stories
1 पाच कॅमेऱ्यांच्या नवीन Poco फोनचा भारतातील पहिलाच ‘सेल’, जाणून घ्या ऑफर
2 Samsung ने आणला नवीन फ्रीज; खरेदी करणाऱ्यांना 38 हजारांचा फोन फ्री, शिवाय 9 हजार कॅशबॅकही
3 Non Chinese Smartphone: पाच कॅमेऱ्यांच्या ‘स्वस्त’ स्मार्टफोनचा सेल, किंमत फक्त…
Just Now!
X