‘शाओमी’च्या Redmi Note 8 सीरिजला ग्राहकांच्या भरभरून प्रतिसादानंतर बहुप्रतिक्षित Redmi Note 9 pro आणि Redmi Note 9 Pro Max स्मार्टफोन भारतात लाँच झाले आहेत. या स्मार्टफोन्समध्ये अनेक आकर्षक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. गुरूवारी दुपारी १२ वाजाता एका ऑनलाइन कार्यक्रमामध्ये या दोन्ही फोनवरून पडदा उठला आहे.

रेडमी नोट प्रो पेक्षा रेडमी नोट प्रो मॅक्स जबरदस्त असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही फोन सर्वसामान्यांच्या बजेटमधील आहे. अॅमेझॉन इंडिया, एमआय होम स्टोर्स, एमआय डॉट कॉम वरून खरेदी करता येऊ शकते.

Redmi Note 9 pro या स्मार्टफोनची विक्री १७ मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे. Redmi Note 9 pro ची विक्री २५ मार्चपासून सुरू होणार आहे.

किंमत –
Redmi Note 9 pro :
4 GB Ram + 64 GB स्टोरेज = १२ हजार ९९९ रुपये
6 GB Ram + 128 GB स्टोरेज = १५ हजार ९९९ रुपये
Redmi Note 9 Pro Max :
4 GB Ram + 64 GB स्टोरेज = १४ हजार ९९९ रुपये
6 GB Ram + 128 GB स्टोरेज = १६ हजार ९९९ रुपये
8 GB Ram + 128 GB स्टोरेज = १८ हजार ९९९ रुपये

तीन रंगात फोन उपलब्ध –
ऑरोरा ब्लू, ग्लेसियर व्हाइट आणि इंटरस्टेलर ब्लॅक या तीन रंगात स्मार्टफोन उपलब्ध असणार आहेत.

आणखी वाचा- Samsung Galaxy M30s चं नवं व्हेरियंट लॉन्च, किंमत १४,९९९ रुपये

स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
दोन्ही व्हेरियंटच्या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस (2400×1080) डिस्प्ले दिला असून सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिला ग्लासही दिला आहे. ५०२० एमएएच क्षमतेची बॅटरी दोन्ही व्हेरियंटला दिली असून फास्ट चार्जिंगसाठी १८ वॅटचा चार्जर दिला आहे. लाँच इव्हेंटमध्ये कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार रेडमी नोट सीरीजचा हा पहिला फोन आहे ज्यामध्ये स्नॅपड्रॅगन ७२० प्रोसेसर देण्यात आला आहे. ४८ आणि ६४ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासह १६ मेगापिक्सलचा इन डिस्प्ले कॅमेरा दिला आहे.