रिलायन्स जिओनं आपल्या ग्राहकांसाठी काही नवे पोस्टपेड प्लॅन्स लाँच केले आहेत. जिओ पोस्टेपड प्लस या सेवेअंतर्गत रिलायन्स जिओनं पोस्टपेड धन धना धन प्लॅनची सुरूवात केली आहे. या प्लॅनची सुरूवातीची किंमत ३९९ रुपये इतकी आहे. या प्लॅनची खासियत म्हणजे यात नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम आणि डिझ्नी+हॉटस्टारसारखी सेवा मोफत देण्यात येत आहे. तर जाणून घेऊ काय विषय आहे जिओच्या धन धना धन वाल्या ५९९ च्या प्लॅनमध्ये.

जिओच्या ५९९ च्या प्लॅनमध्ये कंपनी १०० जीबी हायस्पीड डेटा देत आहे. तसंच यासोबत ग्राहकांना अनलिमिट व्हॉईस कॉलिंग आणि एसएमससेवेचाही लाभ घेता येणार आहे. या प्लॅनसोबतही नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम आणि डिझ्नी+हॉटस्टारसारखी सेवा मोफत देण्यात येत आहे. तसंच जिओ अॅप्सचंदेखील मोफत सबस्क्रिप्शन देण्यात येत आहे.

या प्लॅनसोबत सध्याच्या उरलेल्या डेटापैकी २०० जीबी डेटा पुढेही वापरता येणार आहे. तसंच जिओच्या वायफाय कॉलिंगचीही सुविधा यासोबत उपलब्ध असेल. या प्लॅनसोबत आंतरराष्ट्रीय रोमिंग, सिमकार्डची मोफत घरपोच डिलिव्हरी आणि आयडी कॉलसारख्या सुविधाही मिळाणार आहेत. प्लस सेवेअंतर्गत ग्राहकांना कोणत्याही क्षणी आपला क्रमांक पुन्हा साध्या पोस्टपेड सेवांमध्येही पोर्ट करता येणार असल्याचं जिओचं म्हणणं आहे.

सध्या जिओकडे ५९८ रूपयांचा एक प्रीपेड प्लॅनही आहे. यासोबत ग्राहकांना ५६ दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात येते. ग्राहकांना यासोबत दररोज २ जीबी डेटा देण्यात येतो. तसंच जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येते. तसंच अन्य मोबाईलवर कॉलिंगसाठी २ हजार मिनिटं देण्यात येतात. तसंच यासोबत दररोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचं सबस्क्रीप्शनही देण्यात येत आहे.