रिलायन्स जिओने मागील काही दिवसांपासून टेलिकॉम क्षेत्रात धुमाकूळ घातला आहे. इंटरनेट आणि कॉलिंगच्या विविध ऑफर्स देत कंपनी आपल्या ग्राहकांना खूश करत आहे. अशीच एक धमाकेदार ऑफर कंपनीने पुन्हा एकदा जाहीर केली आहे. यामध्ये ग्राहकांना ट्रिपल कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे. जिओच्या प्राईम ग्राहकांना ही ऑफर देण्यात आली आहे. ३९९ किंवा त्याहून जास्त किंमतीचे रिचार्ज केल्यावर ग्राहकांना लगेचच ४०० रुपये कॅशबॅक देण्यात येणार आहे. याशिवाय ३०० रुपयांचे कॅशबॅक व्हाऊचर ग्राहकांच्या मोबाईल वॉलेटमध्ये जमा होणार आहेत. तर १८९९ रुपयांची ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर खरेदी करता येणार आहे. ही ऑफर १० ते २५ नोव्हेंबर दरम्यान वैध असणार आहे.

‘हे’ पदार्थ कच्चे खाल्ल्यास लाभदायक

या ऑफरसाठी जिओने अॅमेझॉन पे, पे-टीएम, फोन-पे, मोबिक्विक, अॅक्सिस पे आणि फ्रीचार्ज यांसारख्य़ा ई-वॉलेट कंपन्यांशी टायअप केले आहे. याशिवाय ई-कॉमर्सच्या साह्याने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना AJIO, Yatra.com आणि रिलायन्स ट्रेंडसमध्ये खरेदी करता येणार आहे. यातही १५०० रुपयांची खरेदी केल्यावर ग्राहकांना ३९९ रुपये सवलत मिळणार आहे. Yatra.com व्दारे देशांतर्गत विमानाची तिकिटे काढल्यास त्यावरही १००० आणि ५०० रुपयांची सवलत मिळणार आहे. तर रिलायन्स ट्रेंडसमधून १९९९ रुपयांची खरेदी केलेल्यांना ५०० रुपये सवलत मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी या आकर्षक ऑफर्स देऊन कंपनीने त्यांना खूश करण्याचे ठरविले आहे.

Viral Video : ‘कॅप्टन कूल’ धोनीचे नृत्य कौशल्य पाहून पत्नीलाही हसू आवरेना

याआधीही कंपनीने यांसारख्या कॅशबॅक ऑफर आणल्या होत्या. दिवाळीदरम्यान कंपनीने धन धना धन ही ऑफर जाहीर केली होती. यामध्ये ३९९ रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना १०० टक्के कॅशबॅक देण्यात आले होती. म्हणजेच एका अर्थाने हा प्लॅन ग्राहकांना मोफतच मिळाला होता.