24 January 2021

News Flash

Jio चा स्वस्त प्लॅन, 200 पेक्षा कमी किंमतीत 42GB डेटा

200 पेक्षा कमी किंमतीत Jioचा भन्नाट प्लॅन...

बीएसएनएल वगळता देशातील सर्वच आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी डिसेंबर 2019 मध्ये आपल्या प्रीपेड प्लॅनचे दर वाढवले. याशिवाय कंपन्यांनी आपल्या प्लॅन्समध्ये अनेक बदलही केले. त्यामुळे नेमका कोणता प्लॅन निवडावा याबाबत सामान्य ग्राहक संभ्रमावस्थेत आहे. यामध्ये रिलायंस जिओच्या ग्राहकांचाही समावेश आहे. जिओनेही आपले प्लॅन महाग केलेत, पण अन्य कंपन्यांच्या तुलनेत जिओचे प्लॅन जवळपास 25 टक्के स्वस्त आहेत असा दावा कंपनीने केलाय. अशात जर तुम्ही 200 पेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लॅन शोधत असाल आणि त्या प्लॅनमध्ये अधिक इंटरनेट डेटाही पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला अशाच एका प्लॅनबाबत माहिती देणार आहोत.

Reliance Jio चा 199 रुपयांचा प्लॅन:
200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत सर्वाधिक डेटा देणारा प्लॅन म्हणजे रिलायंस जिओचा 199 रुपयांचा प्लॅन. या प्लॅनची वैधता 28 दिवस असून यामध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा वापरण्यास मिळतो. याशिवाय दररोज 100 एसएमएसही मिळतात. दररोज 1.5 जीबी डेटा देणारा हा कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. यात 28 दिवसांसाठी ग्राहकांना एकूण 42 जीबी डेटा मिळतो. यात जिओ ते जिओ कॉलिंगही मोफत आहे, तर अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 1000 नॉन-जिओ मिनिट मिळतात. याशिवाय जिओ अॅप्सचं मोफत सब्सक्रिप्शन मिळतं. नॉन-जिओ मिनिट संपल्यानंतर ग्राहकांना 6 पैसे प्रतिमिनिट दर आकारले जातील.

अन्य कंपन्यांचे प्लॅन:
रिलायंस जिओचा हा प्लॅन कॉलिंगपेक्षा अधिक इंटरनेट डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. एअरटेल आणि व्होडाफोन यांसारख्या कंपन्या अशाच प्रकारच्या ऑफर असलेल्या प्लॅनसाठी जवळपास 250 रुपये आकारतात. पण या दोन्ही कंपन्यांच्या प्लॅन्समध्ये अन्य नेटवर्कवरही अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 2:31 pm

Web Title: reliance jio rs 199 recharge plan offers many benefits and 42gb data know all details sas 89
Next Stories
1 पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडिया सोडणार नाहीत कारण…
2 BS6 इंजिनसह नव्या अवतारात आली Jawa, किंमतही बदलली
3 Realme : 48 मेगापिक्सलसह 4 कॅमेरा असलेल्या फोनवर डिस्काउंट, मिळेल दमदार बॅटरी
Just Now!
X