News Flash

JioPhone 2 खरेदी करणं झालं सोपं, आजपासून ओपन सेल सुरू

यापूर्वी अनेकदा या फोनसाठी फ्लॅश सेलचं आयोजन करण्यात आलं होतं.

JioPhone 2 खरेदी करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण, 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान या फोनसाठी ओपन सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. जिओचं अधिकृत संकेतस्थळ Jio.com वर 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजेपासून हा सेल सुरू झाला आहे. पेटीएम वॉलेटद्वारे पैशांचा भरणा करुन 200 रुपये कॅशबॅकही मिळवू शकतात. यापूर्वी अनेकदा या फोनसाठी फ्लॅश सेलचं आयोजन करण्यात आलं होतं.

Qwerty कीपॅड, यू ट्यूब, व्हॉट्स अॅप आणि फेसबुकचे ‘इनबिल्ट’ अॅप, हॉरिझेंटल डिस्प्ले ही या नव्या फोनची वैशिष्ट्ये आहेत. दिसायला हा फोन जुन्या ब्लॅकबेरी फोनप्रमाणे असून 2 हजार 999 रुपये इतकी या फोनची किंमत ठेवली आहे. फोनमध्ये 512 एमबी रॅम आणि 4 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आलं आहे, मेमरी कार्डद्वारे स्टोरेज 128 जीबीपर्यंत वाढवता येईल. या 4जी फोनमध्ये 2000 एमएएच बॅटरी असून त्यामुळे 14 तासांचा टॉकटाइम बॅकअप मिळेल असा कंपनीचा दावा आहे. यामध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, एनएफसी आणि एफएम रेडिओ यांसारखे कनेक्टिविटी फिचर्स देण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 1:30 pm

Web Title: reliance jiophone 2 available in open sale
Next Stories
1 Amazon Offer ! केवळ 3 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करा iPhone 6
2 दिवाळीसाठी घर सजवताय? मग हे वाचाच
3 जाणून घ्या कसे पाठवायचे whatsapp stickers
Just Now!
X