टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओने ग्राहकांना अधिकाधिक फायदा मिळावा यासाठी All IN ONE प्लॅन लाँच केले आहेत. कंपनीने 222 रुपये, 333 रुपये, 444 रुपये आणि 555 रुपयांचे नवे प्लॅन आणले आहेत.

यामध्ये ग्राहकांना जिओ क्रमांकावर अमर्यादित मोफत कॉलिंग, दररोज 2GB इंटरनेट डेटा, दररोज 100 एसएमएस आणि जिओव्यतिरिक्त अन्य कोणत्याही क्रमांकावर फोन केल्यास सहा पैसे प्रति मिनिट IUC (इंटरकनेक्ट युजेस चार्ज) दरांनुसार एक हजार मिनिट वापरण्यास मिळतील. या चारही प्लॅन्सची वैधता वेगवेगळी असून 222 रुपयांच्या प्लॅनची वैधता एक महिना (28 दिवस), 333 रुपयांच्या प्लॅनची वैधता दोन महिने(56 दिवस), 444 रुपयांच्या प्लॅनची वैधता तीन महिने ( 84 दिवस ) व 555 रुपयांच्या प्लॅनची वैधताही चार महिने(84 दिवस) आहे. या सर्व प्लॅनमध्ये मिळणारे लाभ सारखेच आहेत, केवळ 555 रुपयांच्या प्लॅनमध्ये आययूसी अंतर्गत एक हजार मिनिटांऐवजी अधिक म्हणजे तीन हजार मिनिटं मिळतील. तसंच, ग्राहकांना कोणत्याही प्लॅनवर अतिरिक्त 111 रुपयांचा भरणा करुन अजून एका महिन्यापर्यंत वरील सर्व सेवांचा लाभ घेता येईल.

जिओचा सर्वाधिक विक्री होणारा प्लॅन 399 रुपयांचा असून यामध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो. तीन महिने इतकी या प्लॅनची वैधता आहे. हे ग्राहक आता तीन महिन्यांच्या रिचार्जऐवजी 444 रुपयांचा प्लॅन खरेदी करु शकतात. कारण ग्राहकांना आधीच्या प्लॅनच्या तुलनेत 2जीबी डेटा वापरता येईल. तसंच 1000 मिनिट आययूसी कॉलिंगचा लाभ देखील मिळेल.

दुसरीकडे, जिओने 19 रुपये आणि 52 रुपयांचे दोन स्वस्त प्रिपेड रिचार्ज पॅक बंद केलेत. अनुक्रमे एक दिवस आणि सात दिवस इतकी या दोन्ही पॅकची वैधता होती. हे पॅक बंद झाल्यामुळे आता ग्राहकांना किमान 98 रुपयांचा कॉम्बो-पॅक रिचार्जसाठी उपलब्ध असणार आहे.