23 February 2020

News Flash

Dessert Recipes for Valentine’s Day : रिच चॉकलेट स्ट्रॉबेरी ब्राउनी

Valentine's Day चे औचित्य साधत आम्ही तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलो आहे...

– शेफ मेराजुद्दीन अन्सारी, फोर पॉइंट्स शेरेटन, नवी मुंबई

साहित्य

2 मोठी अंडी
दोन तृतीयांश कप साखरविरहीत कोको पावडर
अर्धा चमचा मीठ
अर्धा चमचा बेकिंग पावडर
1 चमचा व्हॅनिला किंवा कॉफी अर्क. मी नेल्सन मेसीजचा कॉफी अर्क वापरला
अर्धा कप मीठ नसलेले बटर
1 कप साखर
पाउण कप मैदा
1 मिल्क चॉकलेट बार
1 डार्क चॉकलेट बार
5- 7 स्ट्रॉबेरीजचे काप

कृती

ओव्हन 350 फॅरेनहाइटवर प्रीहीट करा आणि 9×9 आकाराच्या चौकोनी ट्रेला पार्चमेंट कागद किंवा फॉइल लावून घ्या आणि त्यावर नॉन- स्टिक स्प्रे फवारा.

बटर आणि साखर एकत्र करा आणि 30 सेकंदाच्या अंतराने मायक्रोवेव करून घ्या. एक मिनिटांपर्यंत बटर वितळेपर्यंत ही कृती करत राहा.
त्यात अंडी, बेकिंग पावडर, मीठ आणि व्हॅनिला किंवा कॉफी अर्क घाला.

त्यानंतर कोको पावडर आणि मैदा घाला व गुठळ्या राहू देऊ नका.

अखेर कापलेले चॉकलेट फोल्ड करा.

आधी तयार केलेल्या पॅनमध्ये हे मिश्रण ओता. त्यावर कापलेल्या स्ट्रॉबेरीज ब्राउनी मिश्रणात टाका आणि 20 ते 25 मिनिटे, त्यात घातलेली

टुथपिक काही, मऊशार कणांसह बाहेर येईपर्यंत बेक करा.

सर्व्ह करण्यापूर्वी थोडे थंड करा किंवा थंडगार सर्व्ह करा

First Published on February 10, 2020 4:01 pm

Web Title: rich chocolate strawberry brownie executive chef merajuddin ansari valentines day nck 90
Next Stories
1 Dessert Recipes for Valentine’s Day : स्ट्रॉबेरी शॉर्ट लेयर पेस्ट्री
2 चहा गरम करा आणि फोनही चार्ज करा, Xiaomi ने आणलं नवं प्रोडक्ट!
3 Vivo चा चार कॅमेऱ्यांचा फोन स्वस्तात खरेदीची संधी; मिळेल 4,500 mAh ची दमदार बॅटरी
Just Now!
X