Samsung कंपनीने आपल्या Galaxy A50s या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असलेल्या या फोनचा मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. त्यासोबत 8 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचे दोन अन्य कॅमेरे आहेत. याशिवाय, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. याशिवाय कंपनीने Samsung Galaxy M21 या स्मार्टफोनच्या किंमतीतही कपात केली आहे.

Samsung Galaxy A50s चे फीचर्स :-
गॅलेक्सी ए50एस स्मार्टफोन भारतात गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात लॉन्च झाला होता. सॅमसंग गॅलेक्सी A50s स्मार्टफोनमध्ये 6.4 इंच फुल HD+ इन्फिनिटी-यू सुपर ऐमोलेड डिस्प्ले आहे. फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरही आहे. अँड्रॉइड 9.0 पायवर काम करणारा हा फोन सॅमसंग Exynos 9611 प्रोसेसरसोबत येतो. या फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅमच्या दोन पर्याय आहेत. दोन्ही व्हेरिअंट 128 जीबी स्टोरेजसह येतात. या फोनमध्ये फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 4000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

नवीन किंमत :-
गॅलेक्सी ए50एस स्मार्टफोन भारतात सप्टेंबर 2019 मध्ये लॉन्च झाला होता. लॉन्चिंगवेळी या फोनच्या 4 जीबी रॅम मॉडेलची किंमत 22,999 रुपये होती. तर, 6 जीबी व्हेरिअंटची किंमत 24,999 रुपये होती. जीएसटी दरांमध्ये वाढ झाल्यानंतर अनेक कंपन्यांप्रमाणे Samsung नेही आपल्या फोनच्या किंमती वाढवल्या होत्या. पण आता कंपनीने Samsung Galaxy A50s च्या किंमतीत कपात केली आहे. जीएसटीमध्ये वाढ झाल्यानंतर या फोनच्या 4 जीबी रॅम मॉडेलची किंमत 21,070 रुपये झाली होती. तर, 6 जीबी व्हेरिअंटची किंमत 26,900 रुपये झाली होती. पण, आता किंमतीतील कपातीनंतर तुम्ही हा फोन 18,599 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. तर, 6 जीबी रॅम व्हेरिअंटची किंमत 20,561 रुपये झाली आहे.