सॅमसंग कंपनी मागील काही दिवसांपासून नवनवीन मॉडेल सादर करुन आपल्या ग्राहकांना खुश करत आहे. Galaxy J4+ आणि Galaxy J6+ या मॉडेलच्या लाँचिंगनंतर आता कंपनीने आपला Galaxy A7 हा आणखी एक फोन लाँच केला आहे. या फोनची मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. याचे कारण म्हणजे या मोबाईलला ३ रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. अशाप्रकारचे फिचर असलेला फोन कंपनीने पहिल्यांदाच लाँच केल्याने याबाबत दोरदार चर्चा आहे. २१ सप्टेंबरला हा फोन दक्षिण कोरीयामध्ये लाँच झाला आणि त्यानंतर आता तो भारतात लाँच होत आहे. दिल्लीमध्ये झालेल्या एका इव्हेंटमध्ये कंपनीने हा फोन लाँच केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॅमेरासाठी चर्चेत असलेल्या या फोनला २४, ८ आणि ५ मेगापिक्सलचे रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. तर या फोनचा फ्रंट कॅमेराही २४ मेगापिक्सलचा आहे. ६ इंचाची फुल एचडी स्क्रीन असलेला हा फोन एकूणच चांगला असेल. यामध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल मेमरी तसेच ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल मेमरी असे दोन वेरियंट उपलब्ध असतील. ही मेमरी ५१२ जीबीपर्यंत वाढविता येऊ शकते. ड्युएल सिम असलेल्या या फोनला ३३०० मिलीअॅम्पियर्सची बॅटरी देण्यात आली आहे. गुगलच्या अँड्रॉईड ओरियो ८.० ऑपरेटींग सिस्टीमवर हा फोन काम करेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samsung galaxy a7 launch in india know features and cost of mobile
First published on: 25-09-2018 at 13:00 IST