26 February 2021

News Flash

स्वस्त झाला Samsung Galaxy M21, ट्रिपल कॅमेऱ्यासह ‘जंबो’ बॅटरी; जाणून घ्या नवी किंमत

6000mAh बॅटरी, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसोबत फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकसारखे दमदार फिचर्स

सॅमसंगने Galaxy M11 या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केल्यानंतर आता कंपनीचा अजून एक बजेट स्मार्टफोन स्वस्त झाला आहे. Samsung Galaxy M21 या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात झाली आहे. कंपनीने Galaxy M21 हा फोन गेल्या वर्षी मार्च महिन्यात लाँच केला होता. तेव्हापासून आता दुसऱ्यांदा या फोनची किंमत कमी झालीय आहे. Samsung Galaxy M21 या फोनच्या किंमतीत एक हजार रुपयांची कपात झाली आहे. किंमतीतील ही कपात फोनच्या दोन्ही व्हेरिअंटसाठी आहे.

ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असलेला Galaxy M21 चा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. तर, 123 डिग्री अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससोबत 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी पुढील बाजूला 20 मेगापिक्सलचा सेंसर आहे. सेल्फी कॅमऱ्यात AIबेस्ड फीचर्स असून फेस अनलॉक पर्यायही उपलब्ध आहे. या फोनमध्ये 6 जीबी रॅमचा पर्याय असून यात कंपनीने इन्फिनिटी यू डिस्प्ले दिलाय.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स  :-
फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी असलेला हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित One UI 2.0 वर कार्यरत असून यामध्ये 6.4 इंचाचा फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) इन्फिनिटी यू सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन असलेल्या या फोनमध्ये Mali-G72 MP3 GPU सोबत ऑक्टा-कोर अ‍ॅक्सीनॉस 9611 प्रोसेसर देण्यात आले आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम21 चे इनबिल्ट स्टोरेज 128 जीबीपर्यंत असून कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये 4जी व्हीओएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस/ ए-जीपीएस, युएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅकचा समावेश आहे. फोनमध्ये मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आले आहे.

किंमत :-
किंमतीत एक हजार रुपयांची कपात झाल्याने आता सॅमसंग गॅलेक्सी एम21 (4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंट) ची किंमत 11 हजार 999 रुपये झाली आहे. तर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 13 हजार 999 रुपये झाली आहे. हा फोन मिडनाइट ब्लू आणि रेवन ब्लॅक अशा दोन रंगात उपलब्ध आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 3:25 pm

Web Title: samsung galaxy m21 with 6000mah battery gets rs 1000 price cut in india check new price sas 89
Next Stories
1 तुमच्याकडचं FASTag ‘फेक’ तर नाही ना?, NHAI ने दिली ‘वॉर्निंग’
2 Twitter मध्ये आलं Voice DM फिचर, आता तुमचा आवाज रेकॉर्ड करुन पाठवा मेसेज
3 पाच कॅमेऱ्याच्या Nokia 5.4 चा पहिल्यांदाच ‘सेल’, किंमत १५ हजारांपेक्षाही कमी
Just Now!
X