सॅमसंग कंपनीने गेल्या आठवड्यात कंपनीच्या Galaxy Unpacked 2020 इव्हेंटमध्ये Samsung Galaxy Note 20 सीरिज लाँच केली. या सीरिजमध्ये Samsung Galaxy Note 20 आणि Galaxy Note 20 Ultra यांचा समावेश आहे. कंपनीने अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि Samsung.com या संकेतस्थळांवरुन आणि काही रिटेल स्टोअर्सद्वारे भारतात गॅलेक्सी नोट 20 सीरिजसाठी प्री-बुकिंग घ्यायला सुरूवात केली आहे. प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 25 ऑगस्टपासून या फोनची डिलिव्हरी देण्यास सुरूवात होणार आहे. पण, भारतात केवळ 4जी व्हर्जनमध्येच हा फोन उपलब्ध होणार आहे.

Gadgets 360 ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. यानुसार, भारतात Samsung Galaxy Note 20 आणि Galaxy Note 20 Ultra 28 साठी प्री-बुकिंग करणाऱ्यांना 25 ऑगस्टपासून फोनची डिलिव्हरी देण्यास सुरूवात होईल. तर, अन्य ग्राहकांना 28 ऑगस्टपासून हा फोन खरेदी करता येईल. सॅमसंगने गॅलेक्सी नोट 20 सीरिज 4जी आणि 5जी दोन व्हर्जनमध्ये आणली आहे. पण, भारतात केवळ 4जी व्हर्जनमध्येच हा फोन उपलब्ध होणार आहे. गॅलेक्सी नोट 20 मॉडेल्ससाठी भारतात जवळपास पाच लाखांपेक्षा जास्त प्री-रजिस्ट्रेशन झाल्याची माहिती कंपनीने दिली. मात्र आतापर्यंत एकूण प्री-बुकिंग किती झाली याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

किंमत :-
सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 च्या 256 जीबी स्टोरेज (4जी) व्हेरिअंटची भारतात किंमत 77 हजार 999 रुपये आहे. तर , सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 अल्ट्रा 5G व्हेरिअंटची किंमत 1, 04,999 रुपये आहे. यात 256 जीबी स्टोरेजचाही पर्याय आहे.

Samsung Galaxy Note 20 फीचर्स :-
ड्युअल-सिम कार्ड (नॅनो + ई-सिम)
ओएस- अँड्रॉइड 10वर आधारित वन यूआय
डिस्प्ले – 6.7 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) इन्फिनिटी-ओ सुपर एमोलेड+ डिस्प्ले
रॅम – 8 जीबी
स्टोरेज – 256 जीबी स्टोरेज
रिअर कॅमेरा – 12-मेगापिक्सल + 64-मेगापिक्सल + 12-मेगापिक्सल
फ्रंट कॅमेरा – 10-मेगापिक्सल
बॅटरी – 4,300mAh
वजन – 198 ग्रॅम
प्रोसेसरचे दोन पर्याय – ऑक्टा-कोर एक्सिनॉस 990 किंवा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865+ चिपसेट

Samsung Galaxy Note 20 Ultra फीचर्स :-
ड्युअल-सिम कार्ड (नॅनो + ई-सिम)
ओएस – अँड्रॉइड 10वर आधारित वन यूआय,
डिस्प्ले – 6.9 इंच WQHD (1,440×3,200 पिक्सेल) इन्फिनिटी-ओ डायनामिक एमोलेड 2एक्स डिस्प्ले
रॅम – 12 जीबी
स्टोरेज – 256 जीबी आणि 512 जीबी स्टोरेज पर्याय (माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट)
रिअर कॅमेरा – 108-मेगापिक्सेल + 12-मेगापिक्सेल + 12-मेगापिक्सेल
सेल्फी कॅमेरा – 10-मेगापिक्सेल
बॅटरी – 4,500mAh
वजन – 213 ग्रॅम
प्रोसेसरचे दोन पर्याय – ऑक्टा-कोर एक्सिनॉस 990 किंवा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865+ चिपसेट