News Flash

Samsung Galaxy Note 9 launch: सॅमसंगचा गॅलेक्सी नोट ९ लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

Samsung Galaxy Note 9 launch: न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन येथे भारतीय वेळेनुसार गुरुवारी रात्री साऊथ कोरियन कंपनी सॅमसंगने शानदार सोहळ्यात गॅलेक्सी नोट ९ हा फोन लाँच केला.

Samsung Galaxy Note 9 launch: न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन येथे भारतीय वेळेनुसार गुरुवारी रात्री साऊथ कोरियन कंपनी सॅमसंगने शानदार सोहळ्यात गॅलेक्सी नोट ९ हा फोन लाँच केला.

Samsung Galaxy Note 9 launch: सॅमसंगच्या गॅलेक्सी नोट ९ या फोनचे गुरुवारी रात्री अमेरिकेत शानदार सोहळ्यात अनावरण करण्यात आले. पॉवरफूल बॅटरी, १ टीबीपर्यंतची मेमरी आणि एस पेनमधील आकर्षक फिचर्स हे फोनचे वैशिष्ट्य असून या फोनची किंमत भारतीय बाजारपेठेत ६५ ते ७० हजार रुपये असण्याची शक्यता आहे.

न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन येथे भारतीय वेळेनुसार गुरुवारी रात्री साऊथ कोरियन कंपनी सॅमसंगने शानदार सोहळ्यात गॅलेक्सी नोट ९ हा फोन लाँच केला. हा फोन दिसायला सध्याच्या गॅलेक्सी नोट ८ सारखाच आहे. मात्र, फोनच्या डिझाईनमध्ये थोडे बदल केल्याने फोन सहज हातात पकडता येतो. गॅलेक्सी नोट ९ हा फोन ६ जीबी रॅम व १२८ जीबी मेमरी आणि ८ जीबी रॅम व ५१२ जीबी मेमरी अशा दोन व्हेरिएंटमध्ये ग्राहकांना उपलब्ध असेल. दोन्ही व्हेरिएंटमध्ये मायक्रो एसडी कार्डची सुविधा असून एक्स्पांडेबल मेमरी ५१२ जीबीपर्यंतची असेल. ६ जीबी रॅम व १२८ जीबी मेमरी असलेल्या फोनची किंमत ९९९. ९९ डॉलर (भारतीय चलनानुसार सुमारे ६८ हजार ७०० रुपये) तर ८ जीबी रॅम व ५१२ जीबी मेमरी असलेल्या फोनची किंमत १२४९ डॉलर (भारतीय चलनानुसार सुमारे ८६ हजार रुपये) इतकी असेल.

भारतीय बाजारपेठेत या फोनची किंमत ६५ ते ७० हजार रुपयांच्या घरात असेल. भारतात हा फोन ड्यूअल सिम व्हेरिएंटमध्येही उपलब्ध असेल, असे समजते. अमेरिकेतील बाजारपेठेत गॅलेक्सी नोट ९ हा फोन २४ ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. गेम खेळताना फोन थंड राहावा, यासाठी फोनमध्ये विशेष तंत्रज्ञानाचा वापरही करण्यात आला आहे. भारतीय बाजारपेठेत हा फोन कधीपर्यंत उपलब्ध असेल, हे अद्याप समजू शकलेले नाही.

फोनचे फिचर्स काय?

  • फोनची स्क्रीन – ६.४ इंच
  • फोनचा डिस्प्ले – क्वाड एचडी + सुपर एमोलेड इन्फिनीटी डिस्प्ले २.०, रिझॉल्यूशन १४४०x२९६० पिक्सल (सॅमसंगच्या गॅलेक्सी नोट सीरिजमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या डिस्प्लेचा वापर)
  • वजन – २०० ग्रॅम
  • प्रोसेसर – अमेरिकेत गॅलेक्सी नोट ९ हा फोन स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसरमध्ये (२.८ Ghz + १.७ Ghz) उपलब्ध असेल. तर भारतात हा फोन एक्सिनॉस ९८१० प्रोसेसरमध्ये (२.८ Ghz + १.७ Ghz) उपलब्ध असेल.
  • एस पेन- गॅलेक्सी नोट ९ मधील एस पेनमध्ये ब्लूटूथ असेल. एस पेनचा वापर रिमॉट कंट्रोल म्हणूनही करता येईल. एस पेनद्वारे तुम्ही फोटो देखील काढू शकाल. ४० सेकंद चार्ज केल्यास एस पेनचा वापर तब्बल अर्धा तासासाठी करता येईल, असा दावा कंपनीने केला आहे.
  • बॅटरीची क्षमता – ४००० एमएएच
  • कॅमेरा – मोबाईल फोनमध्ये ड्युएल रिअर कॅमेरा सेटअप आहे. दोन्ही लेन्स या १२ मेगापिक्सलच्या आहेत. तर फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 1:15 am

Web Title: samsung galaxy note 9 launch event new york price specifications features s pen dual cameras
Next Stories
1 दिर्घकाळ तरुण राहण्यासाठी ‘हे’ पदार्थ टाळा
2 स्वातंत्र्यदिनानिमित्त स्मार्टफोनवर फ्लिपकार्ट देणार ‘या’ खास ऑफर्स
3 स्मार्टफोन्सवर बंपर ऑफर्स, अॅमेझॉनचा फ्रिडम सेल सुरू
Just Now!
X