दक्षिण कोरियाची आघाडीची टेक कंपनी सॅमसंगने भारतात SpaceMax Family Hub हा नवीन फ्रीज लाँच केला आहे. अनेक शानदार फीचर्स असलेला हा प्रीमियम सेगमेंटमधला फ्रीज फ्लिपकार्ट, Samsung.com आणि अन्य ऑनलाइन स्टोअर्समधून 13 ते 26 जुलै दरम्यान प्री-बुकिंगसाठी उपलब्ध असणार आहे.

फीचर्स :-
SpaceMax Family HubTM फ्रीजमध्ये खास फीचर्स आहेत. हा फ्रीज फोनद्वारे कनेक्ट करता येतो. याशिवाय फ्रीजच्या दरवाजावर 21.5 इंच फुल एचडी टच स्क्रीन डिस्प्ले असून 25W स्पीकर आहे. यावर तुमच्या आवडीचे टीव्ही शो किंवा सिनेमे बघू शकतात. प्रीमियम ब्लॅक मॅट फिनिश असलेल्या या फ्रीजमध्ये 657 लीटर स्टोरेज क्षमता आहे. घरातील अन्य स्मार्ट डिव्हाइसलाही हा फ्रीज कनेक्ट होतो. फ्रीजमधील होम कंट्रोल आणि फॅमिली हब स्क्रीन फीचरद्वारे फ्रीज कंट्रोल आणि मॉनिटर करता येतो. याशिवाय यातील फूड मॅनेजमेंट फीचरद्वारे फ्रीजचा दरवाचा न उघडताही आतील वस्तू चेक करता येतात. तर, यातील फॅमिली कनेक्शन फीचरद्वारे टेक्स्ट मेसेजही पाठवता येतात. यामध्ये ब्लूटूथ आणि Bixby व्हॉइस असिस्टंटचा सपोर्ट देण्यात आला आहे.

किंमत :-
कंपनीने या फ्रीजच्या खरेदीवर काही खास ऑफर आणल्या आहेत. या फ्रीजची किंमत कंपनीने 2,19,900 रुपये ठेवली आहे. पण हा फीज ऑफरमध्ये 1,96,990 रुपयांच्या स्पेशल किंमतीसह खरेदी करता येणार आहे. हा फ्रीज खरेदी करणाऱ्यांना कंपनी 37,900 रुपयांचा Galaxy Note 10 lite फोन फ्रीमध्ये देत आहे. इतकंच नाही तर 13 ते 26 जुलै दरम्यान प्री-बुकिंग करणाऱ्यांना कंपनीकडून 9000 रुपये कॅशबॅकही मिळेल. कंपनीकडून या फ्रीजवर 10 वर्षांची वॉरंटी मिळेल. यापूर्वी सॅमसंगने 2018 मध्ये Family Hub 3.0 हा ट्रिपल कुलिंग क्षमता असलेला फ्रीज लाँच केला होता.