News Flash

Dessert Recipes for Valentine’s Day : स्ट्रॉबेरी शॉर्ट लेयर पेस्ट्री

Valentine's Day चे औचित्य साधत आम्ही तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलो आहे...

– शेफ मेराजुद्दीन अन्सारी, फोर पॉइंट्स शेरेटन, नवी मुंबई

साहित्य

केकसाठी
1 कप (2 स्टिक्स) सामान्य तापमानाला आलेले व मीठ नसलेले बटर
2 कप ग्रॅन्युलेटेड साखर
3 कप केकचे पीठ, चाळलेले
1 चमचा बेकिंग पावडर
अर्धा चमचा मीठ
सव्वा कप दूध
चार मोठी अंडी
2 चमचे व्हॅनिला अर्क

स्ट्रॉबेरीजसाठी
एक कॅन भरून ताज्या स्ट्रॉबेरीज, तुकडे केलेल्या
2 चमचे ग्रॅन्युलेटेड साखर
1 चमचा व्हॅनिला अर्क

व्हिप्ड क्रीमसाठी
2 कप हेवी व्हिपिंग क्रीम
पाव कप ग्रॅन्युलेटेड साखर
1 चमचा व्हॅनिला अर्क

कृती

केक बनवण्यासाठी ओव्हन 350 अंशांवर प्रीहीट करा. केकसाठी आठ किंवा नऊ इंचीच्या गोलाकार भांड्याला पार्चमेंट कागद लावून घ्या. केक चिकटू नये यासाठी पार्चमेंट कागदावर बटर आणि पीठ लावा.

इलेक्ट्रिक मिक्सरच्या भांड्यात बटर, साखर सर्वाधिक वेगाने आणि फिकट आणि क्रीमी होईपर्यंत तीन ते चार मिनिटे फेटुन घ्या. गरज पडेल तेव्हा भांड्याच्या कडांना आतून लागलेले मिश्रण काढून घ्या.

मध्यम आकाराच्या भांड्यात केकचे पीठ, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र करा. दुसऱ्या भांड्यात दूध, अंडी, व्हॅनिला अर्क एकत्र व्हिस्क करा. पिठाचे मिश्रण बटरच्या मिश्रणात 3 अडिशन्सह घाला. एकाआड एक दुधाचे मिश्रण आणि अखेरीस पिठाचे मिश्रण असा क्रम ठेवा. प्रत्यकवेळएस भर घालताना भांड्याच्या कडांना लागलेले मिश्रण काढून घ्या.

हे मिश्रण आधी तयार केलेल्या केकसाठीच्या दोन भांड्यात विभागून काढा आणि वरचा भाग खरपूस सोनेरी होईपर्यंत आणि हलका स्पर्श केल्यानंतर वर येईपर्यंत म्हणजे किमान 30 ते 35 मिनिटे बेक करा. पॅन 10 मिनिटे थंड होऊ द्या व त्यानंतर वायर रॅक सामान्य तापमानात थंड होण्यासाठी काढून ठेवा. केकचे लेयर्स प्लॅस्टिक रॅपमध्ये आच्छादून घ्या आणि किमान एक तास दोन दिवसांपर्यंत रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

केक एकत्र करून सर्व्ह करताना स्ट्रॉबेरीज तयार करून घ्या. कापलेल्या स्ट्रॉबेरीज, साखर आणि व्हॅनिला अर्क एका भांड्यात एकत्र करून 20 मिनिटे तसेच ठेवून द्या.

व्हिप्ड क्रीम तयार करण्यासाठी इलेक्ट्रिक मिक्सरने व्हिपिंग क्रीम, साखर, व्हॅनिला अर्क मध्यम आकाराचे पिक्स तयार होईपर्यंत फेटा.
थंड केलेले केकचे लेयर्स फ्रीजमधऊन काढा आणि लहान सुरीने प्रत्येक लेयरला आडवा छेद द्या. त्यानंतर करवतीप्रमाणे आरे असलेल्या मोठ्या सुरीने प्रत्येक लेयर आधी दिलेल्या छेदावरून कापून घ्या.

केक प्लेटवर किंवा स्टँडवर केकचा एक लेयर ठेवा. एक कप व्हिप्ड क्रीमचा थर आणि स्ट्रॉबेरी मिश्रणाचा पाव भाग त्यावर लावा. केकचे बाकीचे लेयर्स, व्हिप्ड क्रीम आणि स्ट्रॉबेरीजसाठी या कृतीची पुनरावृत्ती करा.
केक लगेच सर्व्ह करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 3:47 pm

Web Title: strawberry shirt layer pastry executive chef merajuddin ansari valentines day nck 90
Next Stories
1 चहा गरम करा आणि फोनही चार्ज करा, Xiaomi ने आणलं नवं प्रोडक्ट!
2 Vivo चा चार कॅमेऱ्यांचा फोन स्वस्तात खरेदीची संधी; मिळेल 4,500 mAh ची दमदार बॅटरी
3 तातडीने Delete करा 24 धोकादायक Apps, गुगलने प्ले स्टोअरवरुनही हटवले
Just Now!
X