News Flash

स्टाइल डायरी : दागिन्यांचा बोहो ट्रेण्ड

नवा लूक ट्राय करा!

स्टाइल डायरी : दागिन्यांचा बोहो ट्रेण्ड
नवा लूक

दागिन्यांची जिला खरीखुरी आवड असते तिला त्यात भरपूर वैविध्य हवं असतं. कुंदन वर्कचे दागिने, सोन्याचे दागिने, मोत्याचे दागिने यांच्याबरोबरीने सध्या बोहोमियन पद्धतीच्या दागिन्यांची चलती आहे.

लग्न समारंभाचे दिवस जवळ येत आहेत. या दिवसांत खरेदीची रेलचेल चालू झालेली असते. काय काय आऊटफिट्स घ्यावे, त्यावर कोणत्या अ‍ॅक्सेसरीज घ्याव्यात हा विचार सतत सुरू असतो. कुंदन वर्क केलेले दागिने, सोन्याचे दागिने, मोत्याचे दागिने या नेहमीच्या प्रकारांव्यतिरिक्त हल्ली भरपूर दागिने बाजारात उपलब्ध आहेत. याबद्दलचा आजचा लेख.

केवळ मोती, सोने किंवा हिऱ्यांसारख्या पारंपरिक दागिन्यांना छेद देत डिझायनर्स सध्या बोहो पद्धतीचे दागिने तयार करताना दिसतात. केवळ वेस्टर्न आऊटफिट्स नाही, तर साडय़ा, लेहेंगा, अनारकली सूट्स या सगळ्यांवर ते शोभून दिसतात. सोने, चांदी, हिरे, मोती अशा मौल्यवान धातूंपासून बनविलेले, अत्यंत नाजूक, सुंदर कलाकुसर केलेले दागिने म्हणजे खरे दागिने अशीच दागिन्यांबद्दल सर्वसामान्य संज्ञा प्रचलित आहे; पण या साचेबद्ध संज्ञेपलीकडे जाऊन काळपट दिसणारे, भरगच्च, लांबीला मोठाले दिसतील असे रंगीबेरंगी स्टोन्स, चिवटेबावटे गोंडे यांनी सजलेल्या ज्वेलरीला सध्या खूपच मागणी आहे. या दागिन्यांना बोहेमिअन ज्वेलरी म्हटले जाते. पारंपरिक दागिन्यांना बोहेमिअन ज्वेलरीचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

बंडखोर 'स्टाईल सेन्स' बंडखोर ‘स्टाईल सेन्स’

बोहेमियन ज्वेलरीचे मोटिव्हज हे फॅशनच्या बंडखोरीमधून आलेले आहेत. कोणताही ट्रेण्ड न स्वीकारता बोहेमियन ज्वेलरी बनवली जाते. तिचा वापर करून अत्यंत क्लासी लुक मिळतो. भौमितिक आकार, वेगवगेळे लहानमोठे स्टोन्स, कधीही वापरात नसतील असे काळपट डल रंग, भरपूर साखळ्या किंवा पातळ चेन्स आणि रस्ट लुक यांचा वापर करून बोहेमियन ज्वेलरी बनवली जाते.

बोहो चोकर

ठुशीप्रमाणे गळ्यालगत असलेले बोहो चोकर्स सध्या खूप लोकप्रिय आहेत. त्याला कधी गोंडे किंवा स्टोन्स जडवलेले असतात, तर कधी केवळ रस्ट लुक असलेले चोकर्स तुम्हाला बघायला मिळतील. ब्रॉड नेक असलेला आऊटफिट वापरणार असाल त्या वेळी तुम्ही बोहो चोकर वापरू शकता. बोहो चोकर घालणार असाल त्या वेळी बन असलेली कोणतीही हेअर स्टाइल तुम्ही करा. त्यामुळे चोकर उठून दिसेल. नाही तर मोकळ्या केसांमुळे चोकर लपून राहण्याची शक्यता आहे. बरोबरीने एखादे लहानसे कानातले तुम्ही टीम अप करा. एखादी टिकली लावा. त्यामुळे तुम्हाला क्लासी लुक मिळेल.

बोहो इयिरग्स

लहान, मोठय़ा किंवा ओव्हरसाइज अशा पद्धतीने बोहो इयिरग्स तुम्हाला उपलब्ध होतील. हँिगग किंवा स्टडस् या दोन्ही प्रकारांतील बोहो इयिरग्स तुम्ही वापरू शकता. शर्ट ब्लाऊज, कॉलर ब्लाऊज, क्लोज्ड नेक ड्रेस अशा आऊटफिट्सवर तुम्ही स्टड्स पद्धतीचे बोहो इयिरग्स घालू शकता. काही वेळा बोहो इयिरग्स गोल्ड रस्ट रंगात उपलब्ध होतात. तुमच्या आऊटफिटला साजेसे इयिरग खरेदी करा. हँिगग बोहो इयिरग्ज तुम्ही ओपन नेक ड्रेसेस, ऑफ शोल्डर आऊटफिट्स, कोल्ड शोल्डर आऊटफिट्स यावर वापरू शकता. हँिगग इयिरग्जमध्ये स्टोन्स जडवलेले आढळून येतील. लहान -लहान स्टोन्स, चेन्स यांचाही वापर हँिगग बोहो इयिरग्जमध्ये होतो. गोंडे व टॅसल्सचा वापर हँिगग बोहो इयिरग्जमध्ये होतो. कुर्तीज, हेवी दुपट्टा, अनारकली सूट्स अशा आऊटफिट्सवर हे बोहो इयिरग्ज खूपच उठावदार दिसतात. हेअरस्टाइल करताना इयिरग्जमधील प्रत्येक एलिमेंट दिसेल याची काळजी घ्यावी. बन, केसांच्या वेण्या अशा पद्धतीने हेअरस्टाइल तुम्ही करा. सोबत परफेक्ट आय मेकअप करा. आणि पहा तुम्ही कशा सगळ्यांमध्ये उठून दिसताय ते.

बोहो नेकपिसेस

सध्या वेगवेगळ्या पद्धतींचे बोहो नेकपिसेस उपलब्ध आहेत. त्यात सिंगल चेनचे नेकपिसेस किंवा काही पदराचे नेकपिसेस उपलब्ध आहेत. हे नेकपिसेस नाजूक नसतात, तर काहीसे ओबडधोबड प्रकारात आढळतात. मोठे पेण्डंट, साखळी, गोंडे, टॅसल्स, स्टोन्स, भौमितिक आकार यांचा वापर नेकपिसेसमध्ये होतो. सिंगल चेनमध्ये किंवा काही पदरांमध्ये हे नेकपिसेस उपलब्ध असतात. लेयिरग पद्धतीमध्येही हे नेकपिसेस उपलब्ध आहेत. कॉलर आऊटफिट्स, ओपन नेक आऊटफिट्स, क्लोज्ड नेक आऊटफिट्स, ऑफशोल्डर्स किंवा कोल्ड शोल्डर आऊटफिट्सवर असे नेकपिसेस खूप छान दिसतील. त्याचा रस्ट लुक तुम्हाला क्लासी लुक मिळवून देईल. बोहो नेकपिस घालणार असाल तर त्यावर इयिरग्स घालू नका. ते चांगलं दिसणार नाही. तुमच्या आऊटफिटला शोभून दिसेल अशाच पद्धतीने बोहो नेकपिसेस वापरा. सटल लुक ठेवा.

लहान बोहो अ‍ॅक्सेसरीज

बोहेमियन अंगठी, हेडचेन्स, नोजपिन्स, अँकलेट्स, ब्रेसलेट्स या अ‍ॅक्सेसरीज तुमच्या आऊटफिटवर खूपच खुलून दिसतील. फक्त त्या व्यवस्थित टीम अप करणे आवश्यक आहे. त्याच्या जोडीला परफेक्ट मेकअप तुमचा लुक उठावदार करण्यास मदत करेल. स्मोकी आइज लुक बोहो ज्वेलरीवर खूपच उठावदार दिसतो.

काही टिप्स

-बोहो ज्वेलरी वापरताना ती व्यवस्थित टीम अप करा.
-एकाच वेळी सगळ्या अ‍ॅक्सेसरीज वापरू नका, त्यामुळे लूक भडक दिसेल.
-अँकलेट्स तुम्ही कधीही वापरू शकता.
-एकमेकांपासून दूर असलेल्या अ‍ॅक्सेसरीज एका वेळी तुम्ही घालू शकता. म्हणजेच बोहो इयिरग्स आणि बोहो ब्रेसलेट किंवा बोहो हेडचेन आणि बोहो नोजपिन असे कॉम्बिनेशन खूप छान लुक मिळवून देतात.
-स्मोकी आइज बोहो लुकसाठी परफेक्ट आहेत. आऊटफिट आणि बोहो ज्वेलरी यांचा योग्य ताळमेळ साधून तुम्ही छान लुक मिळवू शकता.

response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2017 2:01 pm

Web Title: style diary new boho trend
Next Stories
1 Mobile Review : ‘ओप्पो ए ५७’ मोबाइल बाजारात उपलब्ध
2 Healthy Living : जाणून घ्या उन्हाळ्यात सब्जा खाण्याचे फायदे
3 gudi padwa 2017 : मुहूर्तावरील खरेदीसाठी बाजारपेठा सज्ज
Just Now!
X