18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

जगातील सर्वात लहान पेसमेकर तयार करण्यात यश

पेसमेकर हा ज्यांना ब्रॅडीकार्डिया असतो त्यांना लावला जातो.

पीटीआय, ह्यूस्टन | Updated: February 21, 2017 4:24 PM

जगातील सर्वात लहान पेसमेकर तयार करण्यात आला असून तो एखाद्या जीवनसत्त्वाच्या कॅप्सूलएवढय़ा आकाराचा आहे. त्यामुळे हृदय चालू ठेवण्यास मदत होते. अमेरिकेतील एका रुग्णाला तो बसवण्यात आला आहे. पेसमेकर हा ज्यांना ब्रॅडीकार्डिया असतो त्यांना लावला जातो. ब्रॅडीकार्डियामध्ये हृदयाचे ठोके मिनिटाला ६० पडणे आवश्यक असते तेवढे पडत नाहीत. मायक्रा ट्रान्सकॅथेटर पेसिंग सिस्टीम असे या पेसमेकरचे नाव असून तो अमेरिकेच्या अन्न  व औषध प्रशासनाने मंजूर केला आहे. यात पेसिंग तंत्रज्ञानाचा वापर केलेला असतो. हा पेसमेकर पारंपरिक पेसमेकरच्या एकदशांश इतक्या आकाराचा आहे व तो सुरक्षितही आहे. हा पेसमेकर बसवण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची नाही असे ह्य़ूस्टन मेथॉडिस्ट हॉस्पिटलचे पॉल शुरमन यांनी सांगितले. हृदयाचे ठोके अनियमित असलेल्या रुग्णांना त्यामुळे जीवदान मिळेल. असे सांगून ते म्हणाले की, जीवनसत्त्वाच्या कॅप्सूलच्या आकाराचा हा पेसमेकर आहे व त्याला कार्डियक वायर लागत नाहीत, ज्याला सर्जिकल पॉकेट म्हणतात. हृदयाचे ठोके कमी असतील तर ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे श्वास अडतो, चक्कर येते. पेसमेकर हा ब्रॅडीकार्डियावरचा उपाय असून त्यामुळे हृदयाचे ठोके नियमित होतात. त्यामुळे हृदयाला विजेचे तरंग दिले जातात व त्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात. कॅथेटरमधून हा पेसमेकर पाठवला जातो व हृदयात बसवला जातो. त्याची बॅटरी दहा वर्षे चालणारी आहे. ज्यांना जास्त पेसमेकर बसवावे लागतात त्यांच्यासाठी मायक्रा टीपीएस तयार करण्यात आला आहे. एक पेसमेकर शरीरात असताना तो बंद करून दुसरा बसवण्याची सोय यात आहे.

First Published on February 14, 2017 2:05 am

Web Title: success to create the worlds smallest pacemaker