News Flash

टेक्‍नोकडून ७,००० एमएएच बॅटरी असलेला ‘Pova 2’ स्‍मार्टफोन लाँच, किंमत १०,९९९ रूपयांपासून

टेक्‍नो पुन्‍हा एकदा १५ हजार रुपयांहून कमी किंमतीच्या विभागामध्‍ये ७,००० एमएएच बॅटरी असलेला स्‍मार्टफोन बाजारात आणला आहे.

tecno launch pova 2 smartphone
टेक्नो पोवा २ स्मार्टफोन

टेक्‍नो या जागतिक प्रिमिअम स्‍मार्टफोन ब्रॅण्‍डने २ ऑगस्‍टला किफायतशीर दरामध्‍ये ग्राहकांना अविश्‍वसनीय पॉवर व स्‍पीड देण्‍याचा मनसुबा असलेल्‍या त्‍यांच्‍या सर्वात शक्तिशाली व प्रि‍मिअम पोवा सिरीजमधील स्‍मार्टफोन ‘पोवा २’च्‍या लाँचची घोषणा केली. नवीन ‘पोवा २’ स्‍मार्टफोनसह ब्रॅण्‍ड टेक्‍नो पुन्‍हा एकदा १५ हजार रुपयांहून कमी किंमतीच्या विभागामध्‍ये ७,००० एमएएच बॅटरी असलेला स्‍मार्टफोन बाजारात आणला आहे. तंत्रज्ञानप्रेमी मिलेनियल व जनरेशन झेड ग्राहकांसाठी डिझाइन करण्‍यात आलेला ‘पोवा २’ मोबाइल डिवाईसेसवर अधिक वेळ घालवणाऱ्या ग्राहकांसाठीही उपयुक्त आहे. कारण साहजिकच बॅटरी जास्त काळासाठी टिकते.

काय आहेत वैशिष्ट्य?

  • ‘पोवा २’ स्‍मार्टफोनमध्ये दीर्घकाळापर्यंत टिकणारी ७,००० एमएएच बॅटरी बॅक-अप व हेलिओ जी८५ शक्तिशाली प्रोसेसर, हायपर-इंजिन गेमिंग टेक्‍नोलॉजी अशा सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांच्‍या माध्‍यमातून देतो सर्वोत्तम गेमिंग व मल्‍टीटास्किंग अनुभव मिळतो.
  • यांमध्ये मर्यादित कालावधीसाठी ४ जीबी + ६४ जीबी करिता १०,४९९ रूपये आणि ६ जीबी + १२८ जीबी करिता १२,४९९ रूपये या स्‍पेशल लाँच किंमतीमध्‍ये ५ ऑगस्‍ट मध्‍यरात्रीपासून दोन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्‍ध असतील
  • या मर्यादित कालावधीनंतर ‘पोवा २’ची किंमत १०,९९९ रूपये (४ जीबी) व १२,९९९ रूपये (६ जीबी) अशी असेल.

टेक्‍नो ‘पोवा २’ डॅझल ब्‍लॅक, पोलार सिल्‍व्‍हर व एनर्जी ब्‍ल्‍यू या तीन आकर्षक रंगांसह ४ जीबी + ६४ जीबी व ६ जीबी + १२८ जीबी या दोन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध आहे. उच्‍च कार्यक्षम मीडियाटेक हेलिओ जी८५ ऑक्‍टा-कोअर प्रोसेसर, इन-बिल्‍ट हायपर इंजिन गेमिंग टेक्‍नोलॉजी आणि १८ वॅट ड्युअल आयसी फार्स्‍ट चार्ज या सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांमधून  गेमिंग व मल्‍टीटास्किंगचा अनुभव मिळतो. अत्यंत शक्तिशाली असलेल्‍या ‘पोवा २’मध्‍ये ४८ मेगापिक्‍सल क्‍वॉड-कॅमेरा सेट-अप आणि ६.९५ एफएचडी+ डॉट-इन डिस्‍प्‍ले आहे, ज्‍यामधून उत्तम व्हिडिओ व गेम स्ट्रिमिंग अनुभव मिळतो.

ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर आयुष्मान खुराणा

टेक्‍नोचे ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर आयुष्मान खुराणा या फोनबद्दल म्‍हणातो, ”टेक्‍नो ‘पोवा २’ हा स्‍मार्टफोन विश्‍वातील ट्रेण्‍डसेटर असणार आहे. ७००० एमएएच बॅटरी, पॉवर-पॅक कार्यक्षमता, स्‍टायलिश डिझाइन या स्‍मार्टफोनला लक्षवेधक पॅकेज आणि माझा प्रवासातील सर्वोत्तम सोबती देखील बनवतात.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2021 4:40 pm

Web Title: tecno pova 2 launch with massive 7000mah battery price starts at rs 10999 in india ttg 97
टॅग : Mobile
Next Stories
1 WhatsApp वर Sexting होणार सुरक्षित? ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
2 रक्षाबंधन, गणपतीमध्ये भटंकतीचा विचार?; जाणून घ्या कोणत्या राज्यात करोनासंदर्भात काय आहेत नियम
3 IDBI बँक भरती २०२१ : ९२० पदांसाठी भरती, पगार ३४००० पासून; जाणून घ्या तपशील