News Flash

द ग्रेट ऑनर सेल ! अनेक स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर्स

आजपासून तीन दिवस म्हणजे २७ ते ३० ऑगस्टच्या दरम्यान हा सेल असणार आहे.

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आजपासून The Great Honor Sale सुरू होत आहे. यामध्ये हुआवे कंपनीची मालकी असणार्‍या ऑनरतर्फे अनेक आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. आजपासून तीन दिवस म्हणजे २७ ते ३० ऑगस्टच्या दरम्यान हा सेल असणार आहे.

या सेलमध्ये ऑनरने नुकताच लाँच केलेल्या Honor 9N या मॉडेलचा एक तासापर्यंत फ्लॅश सेल असेल. तसेच Honor 9 Lite, Honor 9i आणि Honor 10 या स्मार्टफोन्सवर सूट देण्यात आली आहे. Honor 9 Lite हा 4 जीबी रॅम/64 जीबी स्टोरेज असलेला फोन 14 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. तसेच यासाठी तीन हजार रूपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरदेखील जाहीर करण्यात आली आहे.

32 हजार 999 रुपये किंमत असलेल्या Honor 10 या स्मार्टफोनवर 5 हजार रूपयांची सूट मिळणार आहे. त्यामुळे हा फोन 27,999 रूपयांत खरेदी करता येणार आहे. याशिवाय ऑनरचा पहिला ड्युअल रिअर आणि फ्रंट कॅमेरा असलेला स्मार्टफोन Honor 9i ची किंमत 17,999 रुपये आहे, मात्र या सेलमध्ये ग्राहकांना हा फोन 12,999 रुपयांत खरेदी करता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 11:37 am

Web Title: the great honor sale great discount on honor phones
Next Stories
1 विद्यार्थ्यांसाठी इंस्टाग्राम आणणार खास फिचर, काय आहे खासियत?
2 ‘शांत मन असलेल्यांना मधुर स्वप्ने’
3 कृत्रिम बुद्धिमत्ता सॉफ्टवेअरचा कर्करोग निदानात उपयोग
Just Now!
X