30 October 2020

News Flash

पिंपल्सवर रामबाण उपाय म्हणजे हळद ; जाणून घ्या हळदीचा फेस पॅक बनवायची पद्धत

जाणून घेऊयात पिपल्सवर रामबाण ठरणाऱ्या हळदीच्या फेसपॅकबद्दल..

चेहरा हा प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. सर्वांसमोर आपण चांगले दिसावे असे सगळ्यांनाच वाटत असते. मग यासाठी कधी सौंदर्यप्रसाधनांचा वापर तर कधी पार्लरची वाट धरली जाते. पण हे उपाय तेवढ्यापुरते उपायकारक असतात. पिंपल्समुळे चेहरा व्यवस्थित दिसत नाही. मात्र चेहरा दिर्घकाळासाठी चांगला व्हावा असे वाटत असेल तर घरच्या घरी आपल्या स्वयंपाकघरात असणाऱ्या पदार्थांपासून फेसपॅक तयार करता येतात. जाणून घेऊयात पिंपल्सवर रामबाण ठरणाऱ्या हळदीच्या फेसपॅकबद्दल…

१) हळदीमध्ये एन्टी-बॅक्टीरियल (Anti Bacterial) पोषक तत्वे असल्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. तसेच चेहऱ्यावरील डार्क सर्कल्स दूर करण्यासही मदत होते. शिवाय हळधीमधील नैसर्गिक एंटीसेप्टिकमुळे चेहरा आणखी जास्त उजळतो. मुलतानी माती हळदीबरोबर लावल्याने चेहऱ्याचा ग्लो वाढतो. हा पॅक बनविण्यासाठी मुलतानी माती, हळद आणि चंदन पावडर दुधामध्ये एकत्र करावे. चेहरा आणि मानेला हे मिश्रण लावून नंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.

२) दह्यामध्ये रक्षात्मक तत्व आहेत, जे त्वचेला धूळ आणि मातीपासून संरक्षण देते. एका भांड्यात अर्धा चमचा हळदीसोबत दही मिसळा अन् फेसपॅक तयार करा. हा फेसपॅक लावून १५ ते २० ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या…

३) कडूलिंबू त्वचेसाठी फायद्याचा आहे. याच्या वापरामुळे चहरा फ्रेश आणि चमकदार होतो. कडूलिंबाची दहा ते १२ पाने गरम पाण्यात उकळून घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा हळद मिसळा. हा पॅक चेहऱ्यावर लावा. हा फेसपॅक वाळल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या..

४) लिंबामध्ये नैर्सिगक ब्लींचिग तत्वे आहेत. जे त्वचेवरील डागांपासून सुटका करतात. हळदी आणि लिंबाच्या मिश्रणामुळे चेहरा उजळदार आणि पिंपल्स दूर होण्यास मदत होईल. अर्धा चमचा लिंबाचा रसाला हळदीमध्ये मिसळा. त्यानंतर एक थेंब गुलाबजल टाका. याचं मिश्रण व्यवस्थित करा अन् चेहऱ्यावर लावा. हे फेसपॅक वाळल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या…

५) मधामध्ये मिनरल्स आणि विटामिनचं प्रमाण असेत जे त्वचेसाठी फायद्याचं आहे. त्वचा फ्रेश राहण्यासाठी मधाचा वापर करता येऊ शकतो. त्वचेवरील जखम, व्रण आणि काळे डाग जाण्यास मध उपयोगी ठरतो. एक चमचा मधामध्ये हळद मिसळा. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा कच्चे दूध टाकून चांगलं मिश्रण करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा.. १५ मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 1:15 pm

Web Title: these homemade turmeric pack will get rid of pimples nck 90
Next Stories
1 मिनिटांत मिळणार गाडीचा इन्शुरन्स; ongoची डिजिटल अन् पेपरलेस प्रक्रिया
2 राम्बुतान फळ खाण्याचे फायदे माहित आहेत का?
3 जाणून घ्या अंजीर खाण्याचे रहस्यमय फायदे
Just Now!
X