– डॉ. मुबाशीर मुझमिल खान

लहान मुलं जपणं म्हणजे एखाद्या फुलाला जपण्यासारखं आहे. त्यामुळे मुलांसोबत वागताना पालकांना कायम काही गोष्टींचं भान ठेवावं लागतं. बऱ्याच वेळा अतिलाड किंवा अतिभीती यामुळे मुलांच्या मनावर परिणाम होत असतो. परिणामी, त्यांच्या वागण्या-बोलण्यात तो फरक दिसून येतो. अनेक मुलं ही सतत चिडचिड करत असता. बऱ्याच वेळा ते आक्रमकही होतात. मात्र आपली मुलं असं का वागत आहेत. याकडे पालकांचं लक्ष असणं गरजेचं आहे. आपल्या मुलांमध्ये होणारा प्रत्येक बदल पालकांना ओळखता आला पाहिजे. काही वेळा आपलं मूल सतत चिडचिड करतं, मात्र त्या मागचं कारण पालकांना पटकन लक्षात येत नाही. चला तर पाहूयात लहान मुलांमध्ये चिडचिड वाढण्याची काही कारणे.-

Obesity kid
सिडेंटरी लाईफस्टाईल, आऊटिंग, टेस्ट बड्स, स्क्रीन टाईममुळे मुलांचा स्थुलपणा वाढतो? पण म्हणजे काय?
nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
99 fights among psychiatric patients in three years in Nagpur
नागपूर: मनोरुग्णांमध्ये तीन वर्षांत ९९ वेळा हाणामारी
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे

तुमची मुलं जर लहान लहान गोष्टींमध्ये आक्रमक होत असतील तर मुलाला मानसिक आजार असू शकते, हे पालकांनी वेळीच लक्षात घेतले पाहिजे. वैद्यकीय भाषेत याला ‘अटेंशन डेफिसिट हाइपर एक्टिविट डिसऑर्डर’ असे म्हणतात. ही एक मेंदूशी संबंधित समस्या आहे. लहान मुलांमध्ये ही समस्या प्रकर्षाने दिसून येतंय. त्यामुळे पालकांनी मुलांच्या स्वभावातील हे बदल लक्षात घेऊन तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे. जेणेकरून मुलाला या आजारातून बाहेर काढण्यास मदत होऊ शकले.

मुलांमध्ये ही लक्षणे दिसून येतात-
१. एक जागी स्थिर न बसणे
२. बसल्यावर सतत हलत बसणे किंवा काहीतर करत राहणे
३. कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देणे
४. शांत न राहणे
५. सतत विनाकारण बडबड करणे
६. एक काम करत असताना ते सोडून दुसऱ्या कामाकडे लक्ष देणे
७. राग आल्यावर वस्तू फेकून देणे, चिडचिडेपणा

‘या’ गोष्टी नक्की करा

१. आपल्या मुलाशी संवाद साधा –
मुलं बोलत असताना त्याच्याकडे नीट लक्ष द्या. जर बोलत असताना तो अचानक आक्रमक होत असेल तर त्याला शांत करण्याचा प्रयत्न करा. आपल्या मुलांना राग येईल तेव्हा त्यांना चिडवू नका. यामुळे त्यांचा राग आणखी तीव्र होऊ शकतो. आपल्या मुलास आक्रमकते मागील खरे कारण जाणून घ्या. आपल्या मुलांबरोबर मित्रांप्रमाणे वर्तन करा. यामुळे मुलांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, हे जाणून घेण्यास मदत मिळते. जेणेकरून मुलांच्या मनातील नकारात्मक भावना तुम्ही दूर करू शकता. मुलाला मानसिक आजार असल्याचे लक्षात आल्यावर समाज काय बोलेल याचा विचार करून आजारपण लपवू नका. यामुळे समस्या अधिक बिकट बनू शकते.

२. मुलांना मारू नका-
प्रथम आपलं मूल इतर मुलांप्रमाणे सामान्य नाही हे पालकांनी समजून घ्या. त्यामुळे उगाचच मुलांवर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करुन त्याची इतरांशी तुलना करु नका. जेव्हा मुलं आक्रमक वागतात त्यावेळी अनेक पालकांची चिडचिड होते. बरेच लोक मुलांना मारतात. असे करणे चुकीचं आहे. मुलं आक्रमक होत असेल तर त्यांच्यावर न चिडता त्यांची समजूत घातली पाहिजे. जेणेकरून मुलांचा राग शांत होईल.

३. आपल्या मुलाच्या वागण्यावर त्वरित प्रतिसाद द्या-
जर मुलाने नकारात्मक वागणूक दर्शविली तर त्यांना लगेच रोखायला जाऊ नये. मुलाचा राग शांत झाल्यानंतर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करावा.

४. तोडगा काढण्याचा प्रयत्न करा –
तुमच्या मुलाबरोबर बसा आणि त्याला जे वाटते त्याबद्दल मोकळे करा. समस्येवर उपाय शोधा. आपल्या मुलास ध्यान, योग किंवा श्वासोच्छवासाच्या व्यायाम करण्याची सवय लावा. ज्यामुळे मुलाच्या मनावर नियंत्रण राहिलं. आपल्या मुलामध्ये ज्या परिस्थितीत आक्रमक होतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

५. टीव्ही, गेम याचं टाइमटेबल तयार करा-
टीव्ही पाहणे, व्हिडिओ गेम खेळणे किंवा टॅब्लेट वापरण्यात घालवलेल्या वेळेमुळे मुले आक्रमक किंवा हिंसक होऊ शकतात. आपल्या मुलास सामोरे जाणाऱ्या सामग्रीचे नियमन आणि निरीक्षण करणे आवश्यक आहे. टीव्ही पाहण्यासाठी किंवा व्हिडिओ गेम खेळण्यासाठी वेळापत्रक सेट करा. मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. आपल्या मुलांसाठी माहितीपूर्ण प्रोग्राम निवडा किंवा त्यांच्याबरोबर मैदानी किंवा घरातील खेळ खेळा.

६. मुलांना प्रोत्साहन द्या-
आपल्या मुलास बक्षीस देणे खूप महत्वाचे आहे. आपल्या मुलामध्ये सकारात्मक वर्तनात्मक बदल लक्षात घेतल्यास, चांगल्या वर्तनासाठी त्याचे कौतुक करा. जेणेकरून मुलाला प्रोत्साहन मिळेल

( लेखक डॉ. मुबाशीर मुझमिल खान हे खारघर येथील मदरहूड हॉस्पिटलमध्ये बालरोगतज्ज्ञ आणि निओनॅटोलॉजिस्ट आहेत.)