News Flash

तेल जास्त वेळा गरम करणे आरोग्यासाठी धोकादायक; जाणून घ्या खाद्यतेल वापरण्याची योग्य पद्धत

बराच वेळ तेल गरम केले तर ते आपल्या आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते.

बराच वेळ तेल गरम केले तर ते आपल्या आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते.

भाज्या शिजवण्यापासून पुरी तळण्याचे आणि भजी करण्यापर्यंत तेलाचा वापर सगळ्या गोष्टींमध्ये होतो. मोहरी, नारळ, शेंगदाणा, ऑलिव्ह तेल आणि सगळ्यात जास्त रिफाइंड तेल किंवा सोयाबीन तेलाचा वापर केला जातो. परंतु तेल वापरण्याची ही एक पद्धत असते. जर आपण बऱ्याच वेळ तेल गरम केले तर ते आपल्या आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते.

आणखी वाचा : बटाटे आणि कांदे एकत्र ठेवत असाल तर हे नक्की वाचा

१. तेलाचे तापमान कसे तपासावे
काहीही तळण्यापूर्वी तेल चांगले गरम करणे खूप महत्वाचे आहे. तेलाचे योग्य तापमान जाणून घेण्यासाठी सगळ्यात आधी तेलामध्ये भाजीचा एक छोटासा तुकडा टाकूण तपासा, तेलात जाताच भाजी तडतडत राहिली की समजून घ्या तेल व्यवस्थित गरम झाले आहे.

आणखी वाचा : लिंबू फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे का? फायदे, तोटे आणि उपाय

२. तेलातून येणारा धूर टाळा
तेलातून धूर निघू लागला तर हे समजून घ्या की तेल जळतं आहे. अशा वेळी एकतर गॅस बंद करा आणि भाजीपाला तेलात टाका.

आणखी वाचा : मैदा, बेसन आणि पीठाला कीडं लागत असेल तर करा ‘या’ गोष्टी

३. थोड्या थोड्या गोष्टी फ्राय करा
एकाच वेळी अनेक गोष्टी तेलात टाकू नका. यामुळे तेलाचे तापमान हे पूर्णपणे कमी होते आणि आपण त्यात घातलेल्या गोष्टी अधिक प्रमाणात तेल शोषतात. त्यामुळे एका वेळी अनेक गोष्टी तळू नये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 7:58 pm

Web Title: tips to use cooking oil and how to use the remaining oil once again dcp 98
टॅग : Health News,Lifestyle
Next Stories
1 अभिनेत्री टिस्का चोप्राने शेअर केलं तजेलदार त्वचेचं रहस्य..
2 चिया सीड्सचे फायदे आणि अतिवापरामुळे होणारे नुकसान: जाणून घ्या
3 Yoga Day 2021 : घरुन काम करताना किंवा ऑफिसमध्ये खुर्चीवर बसल्या जागी करता येतील अशी योगासने