प्रत्येक स्वयंपाकघरात बटाटा आणि कांद्याचा सर्वात जास्त वापर होतो. प्रत्येक भाजीत कांदा हा वापरला जातो आणि बटाट्यापासून बनवलेले सगळे पदार्थ हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. लॉकडाउन दरम्यान, अनेक स्त्रियांनी बटाटे आमि कांद्याचा साठा केला असेल. परंतु काही दिवसातच बटाट्याला अंकुर आले असतील किंवा उष्णतेमुळे ते सुकले असतील. कांद्याला सुद्धा हिरव्या रंगाचे अंकुर आले असतील. कारण त्यांचा साठा हा योग्यरित्या केला नसेल. तर आज आपण कांदे आणि बटाट्याचा साठा कसा करायचा  जाणून घेणार आहोत…

१. सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की कांदे आणि बटाटे कधीच एकत्र ठेवू नका. यामुळे बटाट्यांना लवकर अंकूर फुटतात आणि ते खराब होऊ शकतात.

आणखी वाचा : तांदूळ शिजवण्याआधी उकळत्या पाण्यात ‘या’ दोन गोष्टी टाका अन् भात चिकटण्याची समस्या टाळा

२. कांदा – बटाटा कधी फ्रीजमध्ये ठेवू नका. कांदे फ्रीजमध्ये ठेवल्याने फ्रीजमधून घाण वास येतो आणि त्यामुळे इतर भाज्या देखील खराब होऊ शकतात. तर, बटाट्यात मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स असतात, जे फ्रीजमध्ये ठेवल्याने कमी होऊ शकतात.

३. कांदे- बटाटे कधीच टॉमेटो, केळी आणि दुसऱ्या फळांसोबत ठेवू नका. त्यामुळे टॉमेटो आणि फळं लवकर खराब होतात.

आता कांदे – बटाटे कसे ठेवले पाहिजे हे जाणून घेऊया…

१. सहसा महिला बास्केटमध्ये कांदे आणि बटाटे ठेवतात. पण बटाटे हे कधीच खुल्या ठिकाणी ठेऊ नका. त्यांना ड्रॉवर, बास्केटमध्ये, कागदाच्या पिशवीत किंवा टोपलीत ठेवा. त्यांना अश्या ठिकाणी ठेवा जिथे अंधार असेल आणि हवा खेळती असेल.

२. तर, दररोज वापरण्यासाठी कांदे कागदाच्या पिशवीत ठेवा आणि त्यावर लहान छिद्र करा. यामुळे कांदे ताजे राहतील.

आणखी वाचा : लिंबू फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे का? फायदे, तोटे आणि उपाय

३. जर तुम्हाला वर्ष भरासाठी कांद्याचा साठा करायचा असेल तर, त्यांना अशा जागी ठेवा जिथे सुर्यप्रकाश येणार नाही आणि ओलावा नसेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४. कांद्यांचा साठा करण्यासाठी ते कोरडे असले पाहिजे.