फळभाज्यांमधील सर्वात आवडती भाजी कोणती असं जर कोणी विचारलं तर अनेक जण टोमॅटो आणि बटाटा या दोनच भाज्याचं नाव घेतील. कारण या दोन्ही भाज्या कोणत्याही पदार्थात घातल्या तर त्या पदार्थाची चव वाढते. त्यात टोमॅटोचा वापर भाजी, आमटीपासून ते कोशिंबीरपर्यंत अनेक पदार्थांमध्ये केला जातो. त्यामुळे स्वयंपाक घरातील एक महत्त्वाची फळभाजी म्हणून टोमॅटोकडे पाहिलं जातं. विशेष म्हणजे टोमॅटो खाण्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत. त्यामुळे हे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.
टोमॅटो खाण्याचे फायदे
१. टोमॅटोमध्ये उष्मांकाचे प्रमाण तसेच कर्बोदकाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे रक्तदाब, हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, मधुमेह या विकारांमध्ये टोमॅटो गुणकारी आहे. त्यामुळे आहारात नियमितपणे टोमॅटोचा वापर करावा.
२.वजन नियंत्रणात आणण्यासाठी टोमॅटोचं सेवन करावं. टोमॅटो खाल्ल्यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते. त्यामुळे भूक मी लागते.
३. रातआंधळेपणा, दृष्टीदोष या विकारांवर टोमॅटो उपयुक्त आहे. हा दोष असणाऱ्या व्यक्तीने जेवणामध्ये रोज १ टोमॅटो नियमितपणे खावा.
४. रक्ताची कमतरता (अॅनिमिया) असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे रोज २ टोमॅटो खावेत. यामुळे रक्ताचे प्रमाण प्राकृत होण्यास मदत होते.
५. यकृताच्या विकारांमध्ये टोमॅटोचा रस गुणकारी आहे.
६. मलावरोधाची तक्रार असणाऱ्यांनी टोमॅटोचे सेवन नियमितपणे करावे.
७. टोमॅटोच्या रसात अर्जुनसाल चूर्ण व साखर घालून अवलेह बनवून तो नियमितपणे खाल्ल्यास हृदयविकार कमी होतो.
‘या’ व्यक्तींनी टोमॅटो खाऊ नये
मूतखडा, संधिवात, आमवात व आम्लपित्त असणाऱ्या रुग्णांनी टोमॅटो सेवन करू नये.
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 8, 2020 12:46 pm