प्रजासत्ताक दिनानिमित्त ट्विटर इंडियानं नवे इमोजी आणले आहेत. इंडिया गेटचं हे इमोजी असून #HappyRepublicDay, #RepublicDay, #RepublicDay2018 असे हॅशटॅग वापरल्यावर त्यासोबत इंडिया गेटचा इमोजी दिसणार आहेत. ट्विटरच्या या नव्या इमोजीचं देशभारातून कौतुक होत आहे. ‘इंडिया गेट’ हा प्रजासत्ताक दिनाचं प्रतीक म्हणून ट्विटरच्या या हॅशटॅगमध्ये दाखण्यात आला आहे. ट्विटरचा हा इमोजी आजपासून दिसू लागला असून २९ जानेवारीपर्यंत हे तीन हॅशटॅग वापरल्यानंतर इंडिया गेटचा इमोजी दिसणार आहे. ट्विटरच्या या हॅशटॅगचं सगळ्यांनी कौतुक केलं.

भारतातील अनेक महत्त्वाच्या दिवशी किंवा सणांच्या कालावधीत ट्विटर असे इमोजी लाँच करत आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या त्या प्रसंगाला अनुरुप असे इमोजी ट्विटर लाँच करत आहेत. सणवार किंवा महत्त्वाच्या दिवशी त्या सणाच्या निगडीत वेगवेगळे हॅशटॅश ट्रेंड होत असतात. म्हणूनच ट्विटरनं त्या हॅशटॅगला साजेसं असे इमोजी लाँच केले आहे. गेल्यावर्षी पावसाळ्यासाठी ट्विटरवर खास छत्रीचा इमोजी आणला होता. हे इमोजी खास मुंबईकर आणि मुंबईच्या पावसासाठी होते. विशेष म्हणजे या इमोजींचं कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील केलं होतं. त्यानंतर दिवाळी, गणेश चतुर्थीनिमत्तदेखील ट्विटर इंडियानं खास इमोजी आणले होते.