18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

Valentine’s Day 2017: असा बनवा आपला ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल

आजच्या दिवसाची तो किंवा ती आतुरतेने वाट पाहत असतो

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: March 21, 2017 5:54 PM

व्हॅलेंटाईन डेला बाजार वेगवेगळ्या भेटवस्तूंनी रंगीबेरंगी फुलांनी, ग्रिटींग कार्डने फुलून गेलेला असतो

प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस खूपच महत्त्वाचा असतो. म्हणूनच आजच्या दिवसाची तो किंवा ती आतुरतेने वाट पाहत असतो. कोणला आजच्या दिवशी प्रेमाची कबुली द्यायची असते तर कोणाला त्या स्पेशल व्यक्तीसाठी आजचा दिवस स्पेशल बनवायचा असतो. म्हणूनच व्हॅलेंटाईन डेला काय करता येईल याचं प्लानिंग आधीपासूनच सुरू झालेलं असतं. तुम्हालाही आपला व्हॅलेंटाइन डे स्पेशल बनवायचा असेल तर मग या गोष्टी नक्की करा.

घरच्या घरी डिनर डेट: व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला डिनर डेटला घेऊन जाणं हे ठरलेलं असतं. आजच्या दिवशी अनेक हॉटेल्समध्ये खास डिनर डेटही असतात पण हा पर्याय न स्वीकारता तुम्ही घरच्या घरीही डिनर डेट अरेंज करु शकता. घर कसे सजवायचे, तुम्ही काय करु शकता याच्या कल्पना तुम्हाला गुगलवर मिळू शकतात. युट्युबवर बघून झटपट एखादा पदार्थही बनवता येऊ शकतो. त्यामुळे घराच्या घरी डिनर डेट स्पेशल ठरू शकते.
लाँग ड्राईव्ह : शहराच्या कलकलाटापासून दूर तुम्ही एखादी लाँग ड्राईव्ही अरेंज करू शकता. हा, पण लाँग ड्राईव्हला जाताना असा पर्याय निवडा जिथे तुम्ही यापूर्वी कधीच गेला नसाल.
हँड मेड गिफ्ट : व्हॅलेंटाईन डेला बाजार वेगवेगळ्या भेटवस्तूंनी रंगीबेरंगी फुलांनी, ग्रिटींग कार्डने फुलून गेलेला असतो. पण विकत घेऊन एखादे गिफ्ट देण्यात जी मज्जा नाही ती मज्जा स्वत:च्या हाताने तयार केलेल्या गिफ्टमध्ये असते त्यामुळे तुम्ही स्वत:च्या हाताने एखादी भेटवस्तू तयार करून तिला देऊ शकता. याव्यक्तिरिक्तही अनेक छोट्या मोठ्या कल्पना वापरून आजचा दिवस तुम्ही स्पेशल बनवू शकता.

First Published on February 14, 2017 10:44 am

Web Title: valentines day 2017 how to make valentines day special on a budget