जास्तकाळ हिंसक व्हिडिओ गेम्स खेळल्याने बालकांच्या निर्णय क्षमतेच्या विकासावर परिणाम होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.
लहान मुलांनी जास्तवेळ हिंसक वृत्तीचे व्हिडिओ गेम्स खेळल्याने याचा त्यांच्या व्ययक्तीक वागण्यावर आणि मानसिक वृत्तीवर परिणाम होतो. त्यामुळे कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करू नयेत याचा निर्णय घेण्यात अशा बालकांना वेळ लागतो किंवा त्यांच्याकडून चुकीचेही निर्णय घेतले जाऊ शकतात असेही संशोधकांचे म्हणणे आहे.
कॅनडातील मीरजाना बाजोवीक ब्रोक विद्यापीठाने मुले खेळत असलेल्या व्हिडिओ गेम्स आणि त्याचे प्रकार तसेच याचा त्यांच्या वागण्यावर होणारा परिणा याच्यावर संशोधन केले. यात त्यांनी तेरा ते चौदा वर्षांच्या मुलांचा गट निवडला त्यांच्या व्हिडोओ गेम्स खेळण्याची वेळ, प्रकार आणि आवड यावर सविस्तर अभ्यास केला असता हिंसक वृत्तीचे व्हिडिओ गेम्स खेळणाऱया बालकांमध्ये निर्णय क्षमतेचा अभाव असल्याचे किंवा निर्णय घेण्याबाबतीत अशी मुले संभ्रमीत वागत असल्याचे दिसून आले.