News Flash

लस घेण्याआधी आणि नंतर काय खावे व काय खाऊ नये? जाणून घ्या

या गोष्टींचा समावेश तुमच्या आहारात केल्यास करोना लसीमुळे होणारे परिणाम हे कमी होतील.

लस घेण्या आधी आणि नंतर या पदार्थांचा समावेश तुमच्या आहारात करा. (Photo Credit : File Photo)

करोनाने पुन्हा एकदा आपल्या जीवनशैलीला बदलले आहे. त्यात आता तिसरी लाट जवळ येत असताना, प्रत्येक व्यक्ती लस घेण्यासाठी पुढे येत आहे. मग अशा परिस्थितीत तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न पडला आहे तो म्हणचे करोना लस घेण्या आधी आणि घेतल्यानंतर काय खाल्ले पाहिजे आणि काय नाही? या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

दिल्लीत असलेल्या न्यूट्रिशनिस्ट अंबिका धार यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. “हे सगळ्यांत सोपं आहे. आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आपण पौष्टिक आहाराचे सेवन करणे महत्वाचे आहे. एवढंच नाही तर तणावमुक्त असने गरजेचे आहे. जेणेकरुन करोना लसीमुळे होणारे परिणाम आपल्यावर कमी होऊ शकतात,” असे अंबिका यांनी सांगितले.

१. हळदीचं दूध
जर आपल्याला कसला तणाव असेल तर हळदीचं दूध प्यायल्याने तणाव कमी होतो. लस घेण्यापूर्वी किंवा आधी एक कप हळदीचं दूध प्या. यामुळे डोकं शांत होतं आणि लस घेतल्यामुळे होणारे परिणाम कमी होतात.

२. लसूण
आपल्या जेवणात लसणाचे प्रमाण थोडं वाढवा कारण त्यात असणारे प्रोबियोटिक्सचा आपल्याला फायदा होतो. लसून खाल्याने आपल्या शरीरातील आतड्यांना ताकद मिळते. तर त्याचसोबत आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. परंतु दह्याचे पदार्थ किंवा दही खाने टाळा.

३. हिरव्या भाज्या
फक्त लस घेण्यापूर्वी किंवा लस घेतल्यानंतर नाही तर नेहमी हिरव्या भाजीपाल्याचा समावेश आपल्या आहारात असने महत्त्वाचे आहे. भाज्यांमधून आपल्याला सगळ्या प्रकारची पोषक द्रव्ये मिळतात. लस घेतल्यानंतर चिडचिड होतं असेल किंवा शरीरात जळजळ होतं असेल. तर, पालक आणि ब्रॉकोलिचा समावेश तुमच्या आहारात करा.

४. फळे
फळांमध्ये सगळ्या प्रकारची पोषक द्रव्ये आहेत. त्यामुळे लस घेण्याआधी किंवा नंतर फळांचा समावेश तुमच्या आहारात करा. सफरचंद आणि किवी खा.

५. आले
आले उच्च रक्तदाब, कोरोनरी आजार आणि फुफ्फुसाच्या संसर्गासारख्या आजारांना नियंत्रित आणण्यासाठी मदत करते. एवढंच नाही तर तणाव कमी करण्यास आले मदत करते. एक कप मसाला चहा प्यायल्याने तणाव कमी होईल.

६. डार्क चॉकलेट
डार्क चॉकलेटचा समावेश तुम्ही दैनंदिन जीवनात देखील करू शकतात. यामुळे कोरोनरी आजार होण्याची शक्यता कमी होते. डार्क चॉकलेट हे लस घेतल्यानंतर खाल्ले पाहिजे.

७.ब्लुबेरीज
ब्लुबेरीजचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात करायला पाहिजे कारण ब्लुबेरीजमध्ये ‘व्हिटामिन सी’चे प्रमाण जास्त असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 5:09 pm

Web Title: what to eat before and after vaccination know more here dcp 98
टॅग : Health News,Lifestyle
Next Stories
1 रात्री उशिरा  जेवणाचे तोटे
2 गर्भवतींची काळजी
3 सौंदर्यभान : पावसाळ्यात त्वचेची निगा
Just Now!
X