व्हॉटसअॅप सध्या जगभरातील प्रसिद्ध अॅप्लिकेशन म्हणून ओळखले जाते. दिवसागणिक या अॅपमध्ये समाविष्ट होणाऱ्या फिचर्समध्ये वाढ होत असल्याने त्याचा वापर नेटीझन्ससाठी अतिशय सोयीचा होत आहे. मात्र तरीही व्हॉटसअॅपमध्ये आणखी काही फिचर्सचा अभाव आहे. व्हॉटसअॅपची इतर अॅप्लिकेशन्सची चालू असणारी स्पर्धा पाहता इतर अॅप्लिकेशन्स ग्राहकांना नवनवीन फिचर्स देऊन भुरळ घालण्याचे काम करत आहेत. ही फिचर्स व्हॉटसअॅपमध्ये नाहीत. आता ही वेगळी फिचर्स नेमकी कोणती ते पाहूयात…

१. स्टीकर्स

हे एक असे फिचर आहे जे बऱ्याच मेसेजिंग अॅपमध्ये वापरले जाते. याव्दारे आपण मनातील भावना काहीही न लिहीता चिन्हांच्या माध्यमातून पोहचवू शकतो. फेसबुक मेसेंजर, हाईक यांसारख्या मेसेजिंग अॅप्समध्ये हे फिचर देण्यात आले असून यामाध्यमातून संवाद साधणे आणखी सोपे होणार आहे. व्हॉटसअॅपमध्ये सध्या असणाऱ्या स्माईलींपेक्षा हे स्टीकर्स वेगळे आहेत.

२. GIF सेल्फी

गूगलने आपल्या यलो या अॅप्लिकेशनमध्ये GIF सेल्फी हे नवीन फिचर जोडून दिले आहे. यामध्ये तुम्ही आपल्या सेल्फी कॅमेराने शूट करुन GIF बनवू शकणार आहात. हे अनोखे असे फिचर व्हॉटसअॅपमध्ये मात्र नाही.

३. प्रायव्हेट चॅट

या चॅटमध्ये एक अनोखा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये चॅटींगनंतर मेसेजेस स्वतःहून डिलिट होतात. हे चॅट डिलिट करण्यासाठी आपण टायमरही लावू शकतो. ही सुविधा गूगल यलो, वीचॅट यांसारख्या अॅप्लिकेशन्सवरही उपलब्ध आहे.

४. पोक फिचर

लोकांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी पोक या अॅपचा वापर केला जातो. पोक केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला आपण पोक केल्याचे नोटीफीकेशन जाते. हे अॅप्लिकेशन मेसेजिंग अॅप्लिकेशनवर आहे.