टेक्स मेसेजमध्ये सर्वाधिक वापर हा शब्दांऐवजी इमोजींचा होत आहे, इमोजींनीमुळे एखादी भावना सहज व्यक्त करता येते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला काय सांगायचं हे थेट कळतं. आता हेच लक्षात घेऊन व्हॉट्स अॅप लवकरच इमोजीला पर्याय म्हणून आपलं ‘स्टिकर्स’ हे फीचर आणणार आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या F8 परिषदेत व्हॉट्स अॅपनं ‘स्टिकर्स’ फीचर येणार असल्याची घोषणा केली होती.

WABetaInfo च्या माहितीनुसार लवकरच हे फीचर येणार आहे. सध्या WhatsApp Android beta version 2.18.218. वर हे फीचर उपलब्ध
आहे. यानुसार युजर्सला स्टिकर्सचे पॅक मिळणार आहे. पॅकमध्ये चार प्रकारचे स्टिकर्स असणार आहे. ‘Lol’, ‘Love’, ‘Sad’, आणि ‘Wow’ अशा एकूण चार रिअॅक्शन या स्टिकर्समध्ये असणार आहे. हे पॅक युजर्सना डाऊनलोड करता येऊ शकते असं व्हॉट्स अॅप बिटा इन्फोनं म्हटलं आहे. डाऊनलोड केल्यानंतर हे स्टिकर्स युजर्सला चॅटमध्ये वापरता येऊ शकतात. व्हॉट्स अॅपवरून इमोजी काढून त्याजागी हे स्टिकर्स पर्याय म्हणून उपलब्ध करण्यात आले आहेत अशा चर्चा होत्या मात्र व्हॉट्स अॅपनं या चर्चांना अधिकृत दुजोरा दिला नाही.

व्हॉट्स अॅप स्टिकर्स आयकॉनचा पर्याय GIF बटनच्या पुढे उपलब्ध होईल मात्र हे फीचर अँड्राईड युजर्ससाठी कधी उपलब्ध होईल याची घोषणा मात्र व्हॉट्स अॅपनं केली नाही.