सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये माणसं त्यांच्या कामामध्ये प्रचंड गुरफटून गेली आहेत. त्यामुळे कुठे तरी त्यांचं हास्य हरवत चाललं आहे. ताणतणाव आणि दगदग त्यांच्या जगण्याचा भाग झाला आहे. या साऱ्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर आणि मनावरही होतो. हे सारं टाळायचं असेल तर सर्वात उत्तम उपाय म्हणजे खळखळून हसणं. हसण्याचं महत्व समजून देण्यासाठी जगभरामध्ये हास्य दिन साजरा केला जातो. त्यामुळे आज ५ मे रोजी जगभरामध्ये जागतिक हास्य दिन साजरा करण्यात येत आहे.

हास्य ही मानवाला लाभलेली अप्रतिम देणगी आहे. ज्याला मनमोकळे, खळखळून हसता येते तो माणूस सुदैवी आहे. हसणार्‍या चेहर्‍याभोवती मित्रमैत्रिणींची गर्दी होते. एक वेगळाच प्रभाव समोरील व्यक्तीवर पडत असतो. शिवाय हसतमुख चेहर्‍याच्या व्यक्ती अनेक कठीण प्रसंगांवरही सहज मात करतात. हास्य हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. हा घटक आपण जेवढा विकसित केला तेवढे आपले जीवन सुखी आणि आनंदी होत असते.

self awareness in artificial intelligence
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता- स्व-जाणीव
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
Trigrahi Yog in Meen Rashi
३ ग्रहांची महायुती होताच घडणार त्रिग्रही योग; ‘या’ राशींचे चमकणार भाग्य? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
9th April 2024 Panchang & Marathi Horoscope
गुढीपाडवा विशेष राशी भविष्य: ९ एप्रिलला मेष ते मीनपैकी कुणाचं नशीब घेईल कलाटणी; तुमचं नववर्ष होणार गोड?

हास्य ही मूलत: जागतिक भाषा आहे. जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात तुम्ही गेला तरी या भाषेने तुम्ही इतरांसोबत संवाद साधू शकता. जगातील सर्व माणसे आनंदाची स्थिती व्यक्त करण्यासाठी याच भाषेचा वापर करतात. स्मित हास्य, खळखळून हसणं, पहाडी हास्य असे हास्यांचे विविध प्रकार असले तरी आनंद हाच त्यामागील भाव असतो. कुत्सित हास्य तेवढे प्रकर्षाने टाळावे. जगातील कोणत्याही दोन हसणार्‍या व्यक्तींमध्ये सहज मैत्री होऊ शकते. मग त्या व्यक्ती कोणत्याही देशाच्या, भाषेच्या, जातीच्या, धर्माच्या असोत. कारण, हास्य हा सर्वांचा समान धर्म आहे. हास्य हे जगातील सर्वांशी मैत्री करून देणारे प्रभावी आनंदास्त्र आहे.