शाओमीने एक खास पंखा आणलाय, हा पंखा तुमच्या स्मार्टफोनला थंड ठेवेल. शाओमीने काही दिवसांपूर्वी या ‘एक्स्टर्नल क्लिप-ऑन कुलिंग फॅन’ची घोषणा केली होती. आता कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर या ‘कुलिंग फॅन’चा सेल सुरू झालाय. केवळ दोन सेकंदांमध्ये हा पंखा तुमचा फोन थंड करेल असा कंपनीचा दावा आहे.

10 डिग्रीपर्यंत तापमानात होते घट :
बराच वेळ फोनचा वापर केल्यानंतर त्या फोनचं तापमान वाढतं. विशेषतः मोठे गेम्स खेळताना फोन गरम होण्याचं प्रमाण जास्त असतं, कधीकधी तर हातातही पकडता येत नाही इतका फोन गरम झालेला असतो. पण, हा पंखा गरम झालेल्या स्मार्टफोनचं तापमान अवघ्या दोन सेकंदांमध्येच १० डिग्री कमी करतो, असा दावा कंपनीने केला आहे. सध्या हा पंखा केवळ चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे, पण लवकरच भारतातही उपलब्ध केला जाण्याची शक्यता आहे.

या कुलिंग फॅनची किंमत 129 युआन (जवळपास 1,300 रुपये) आहे. शाओमीच्या क्लिप-ऑन एक्स्टर्नल आइस कुलिंग फॅनमध्ये पाच पात्या असून 6000 rpm वर कार्यरत असलेला हा फोन 67-88mm रुंदी असलेल्या कोणत्याही फोनसाठी वापरता येतो. या फॅनच्या पुढील बाजूला ब्लॅक शार्कचा लोगो आहे.