‘शाओमी’ने भारतात आपली Mi Notebook सीरिज लाँच केली आहे. या सीरिजअंतर्गत कंपनीने Mi Notebook 14 आणि Mi Notebook 14 Horizon Edition हे दोन लॅपटॉप लाँच केले आहेत. दोन्ही लॅपटॉपची विक्री 17 जूनपासून सुरू होणार आहे. युजर्स हे लॅपटॉप अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवरुन खरेदी करु शकतात. याशिवाय कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरुनही लॅपटॉप खरेदी करता येतील. जाणून घेऊया विंडोज 10 ओएसवर कार्यरत असणाऱ्या शाओमीच्या या लॅपटॉपमध्ये काय आहे खास…

Mi Notebook 14 Horizon Edition स्पेसिफिकेशन्स :-
Horizon Edition सह कंपनीने पॉप्युलर लाइट आणि पोर्टेबल अल्ट्राबुक कॅटेगरीमध्ये एंट्री केली आहे. 1.35 किलो वजन असलेल्या या लॅपटॉपमध्ये अनेक शानदार फीचर्स आहेत. यात 14 इंचाचा फुल एचडी होराइजन डिस्प्ले असून सिजर स्विच कीबोर्ड, स्टीरियो स्पीकर, मल्टी टच ट्रॅकपॅड आणि युएसबीचे 3 पोर्ट्स आहेत. लॅपटॉपमध्ये शानदार बॅटरी बॅकअप मिळेल. कंपनीचा दावा आहे की एकदा चार्ज केल्यानंतर हा लॅपटॉप 10 तासांचा बॅकअप देतो. तसेच केवळ 35 मिनिटांमध्ये 0 ते 50 टक्के चार्ज होतो असं कंपनीने म्हटलंय. हा लॅपटॉप 8जीबी रॅम आणि 512जीबीच्या SATA SSD स्टोरेजसह येतो. स्टीरियो स्पीकरसह यामध्ये डीटीएस ऑडियो प्रोसेसिंग फीचरही आहे. Mi Notebook 14 Horizon Edition च्या Intel Core i5 मॉडेलची बेसिक किंमत 54,999 रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये Intel Core i7 चा सपोर्ट असलेल्या दुसऱ्या व्हेरिअंटची किंमत 59,999 रुपये आहे.

Mi Notebook 14 स्पेसिफिकेशन्स :-
लाँच झालेल्या दोन्ही लॅपटॉपच्या तुलनेत Mi Notebook 14 हा थोडा स्वस्त आहे. यामध्ये 14 इंचाचा होराइजन डिस्प्ले आहे. हा लॅपटॉप तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. याच्या टॉप व्हेरिअंटमध्ये 512जीबी SATA SSD स्टोरेज मिळेल. लॅपटॉपमध्ये इंटेल अल्ट्रा एचडी ग्राफिक कार्ड आहेत. या सीरिजचे सर्व लॅपटॉप इंटेल 10th जनरेशन कोर i5 प्रोसेसरसह येतील. लॅपटॉपमध्ये 8जीबी रॅमसह Mi Webcam HD मिळेल. Mi Notebook 14 च्या बेसिक व्हेरिअंटची( 256 जीबी एसएसडी मॉडेल) किंमत 41,999 रुपये आणि 512 जीबी एसएसडी मॉडेलची किंमत 44,999 रुपये आहे. तर, Nvidia GeForce MX250 जीपीयूसह येणाऱ्या तिसऱ्या मॉडेलची किंमत 47,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या किंमती 16 जुलैपर्यंत असणार आहेत. 16 जुलैनंतर शाओमीकडून किंमतीत वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


शाओमीच्या लॅपटॉपची भारतात HP, Dell, Acer, Asus आणि Lenovo यांसारख्या कंपन्यांशी स्पर्धा असेल.