5 benefits of consuming 1 anaar pomegranate daily: फळे खाणे आरोग्यासाठी नेहमीच खूप फायदेशीर असते. असेच एक फळ म्हणजे डाळिंब, जे केवळ चविष्ट आणि पौष्टिकच नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. ‘दररोजचे एक डाळिंब १०० आजार बरे करते’ अशी एक म्हण आहे. ही केवळ एक म्हणच नाही, तर आरोग्य तज्ज्ञदेखील ती खरी मानतात. खरं तर, डाळिंबात अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर व फायटोकेमिकल्स भरपूर प्रमाणात असतात. जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते, तसेच अनेक आजारांपासून संरक्षण करते. डायटेटिक प्लेसच्या संस्थापक व पोषणतज्ज्ञ साक्षी सिंह यांनी डाळिंबाचे फायदे स्पष्ट केले आहेत.

हृदयाचे आरोग्य

दररोज डाळिंब खाणे किंवा त्याचा रस पिणे हृदयासाठी खूप चांगले असू शकते. २०१२ मध्ये डाळिंबामुळे हृदयरोगापासून संरक्षण या विषयावरील एका अभ्यासात असे दिसून आले की, डाळिंबाचे सेवन हृदय प्रणालीतील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करून, रक्तदाब कमी करण्यास आणि धमन्यांचे संरक्षण करण्यास कसे मदत करू शकते. याचा अर्थ असा की, डाळिंब शरीराला हानिकारक मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीशी लढण्यास मदत करते. अभ्यासात असेही आढळून आले की, डाळिंबाचा रस कोलेस्ट्रॉल जमा होण्याची शक्यता कमी करू शकतो. रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होण्यास प्रतिबंध करू शकते आणि एथेरोस्क्लेरोसिसचा धोका कमी करू शकते. डाळिंबामध्ये असलेले पॉलीफेनॉल आणि अँथोसायनिन्स हृदयाच्या धमन्या स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी नियमितपणे डाळिंब खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका आणि रक्तदाब यांसारख्या आजारांपासून बचाव होतो.

त्वचेचे आरोग्य

डाळिंबाच्या रसात असलेले जीवनसत्त्वे अ, क व ई त्वचेच्या पेशी दुरुस्त करतात आणि सुरकुत्या रोखतात. डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. दररोज त्यांचे सेवन केल्याने त्वचेचे मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानापासून संरक्षण होते आणि कोलेजन उत्पादन वाढवते. त्यामुळे त्वचा चमकदार होईल आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावेल. त्याशिवाय डाळिंबाचे सेवन केल्याने केस मजबूत होतात. ते टाळूला पोषण देण्यासाठीही फायदेशीर आहे.

मेंदूचे आरोग्य

अनेक अभ्यासांनुसार, डाळिंबामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स मेंदूमध्ये ऑक्सिडेटिव्ह ताण येऊ देत नाहीत आणि मेंदूमध्ये कोणत्याही प्रकारची जळजळ होण्यास प्रतिबंध करतात. त्याचे नियमित सेवन केल्याने अल्झायमर व डिमेंशिया यांसारख्या न्यूरोलॉजिकल समस्यांचा धोका कमी होतो. डाळिंबाचे सेवन मेंदूसाठी वरदानापेक्षा कमी मानले जात नाही.

बीपी-शुगर कंट्रोल

डाळिंबामध्ये नैसर्गिक गोडवा असतो, त्यामुळे शरीराचा ग्लायसेमिक इंडेक्स वेगाने वाढत नाही. मधुमेहाच्या रुग्णांनी मर्यादित प्रमाणात डाळिंबाचे सेवन केल्यास त्यांना अनेक फायदे मिळतात. त्याचबरोबर त्यात असलेले पोटॅशियम आणि नायट्रेट्स रक्तदाब नियंत्रित ठेवतात.

मजबूत पचनसंस्था

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डाळिंबामध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे दोन्ही प्रकारचे फायबर भरपूर प्रमाणात असते आणि त्याच्या बिया प्रीबायोटिक्स म्हणून काम करतात. म्हणून डाळिंबाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.२०१७ च्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, डाळिंब किंवा त्याचा रस दाहक आतड्यांसंबंधी रोग (IBD) आणि इतर आतड्यांसंबंधीच्या समस्या असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण- त्यात पॉलिफेनॉलचे प्रमाण जास्त आहे.