5 Common Breastfeeding Mistakes : आईचे दूध हे बाळासाठी पहिले आणि सर्वात महत्वाचे अन्न असते. त्यात पोषक तत्व आणि अँटीबॉडीज असतात जे बाळाचे पोट भरण्यास मदत करतात, शिवाय विविध आजारांपासून संरक्षण बाळाचे संरक्षण करते. पण काही माता बाळा स्तनपान करताना अनेकदा नकळतपणे काही चुका करतात ज्यामुळे बाळाची वाढ आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. याच विषयावर प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. पुनीत आनंद यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात त्यांनी स्तनपान करताना मातांनी कोणत्या ५ चुका टाळल्या पाहिजेत याविषयी माहिती दिली आहे.
स्तनपान करताना मातांनी चुकूनही करु नका ‘या’ चुका (Breastfeeding Mistakes All New Mothers Should Avoid)
१) रात्री दूध न पाजणे
डॉ. पुनीत आनंद सांगतात की, रात्री दूध पाजल्याने दुधाचा पुरवठा सर्वात जास्त वाढतो. जर मातांनी बाळाला रात्री दूध पाजले नाही तर दुधाचे प्रमाण हळूहळू कमी होऊ शकते. त्यामुळे बाळ रात्री उठल्यास त्याला दूध पाजण्याचा प्रयत्न करा.
२) कोलोस्ट्रम न देणे
जन्मानंतर येणाऱ्या पहिल्या जाड पिवळ्या दुधाला कोलोस्ट्रम म्हणतात. बहुतेकजण पहिले दूध बाळासाठी चांगले नाही असे मानतात . यावर डॉ. पुनीत म्हणाले की, आईचे पहिले दूध हे बाळासाठी पहिल्या लसीकरणासारखे असते, जे त्याला अनेक संसर्गांपासून वाचवते. ते निरुपयोगी समजू नका आणि ते बाळाला नक्कीच पाजा.
३) बाटली किंवा पॅसिफायर देणे
जर तुम्ही सुरुवातीच्या काळात बाटली किंवा पॅसिफायर देण्याची सवय लागली तर बाळाला स्तनपान करताना अडचणी येतात. यामुळे बाळ आईचे दूध पिण्यास लवकर तयार होत नाही आणि त्याचा मातेच्या स्तनपानावर परिणाम होतो.
४) रडत असल्यास नेहमी भूक लागली असे समजणे
डॉ. पुनीत म्हणतात की, बाळ जेव्हा जेव्हा रडते तेव्हा त्याचा अर्थ असा नाही की त्याला भूक लागली आहे. कधीकधी बाळ फक्त मांडीवर घेण्यासाठी आराम मिळवण्यासाठी किंवा डायपर बदलण्यासाठीही रडते. कोणत्याही कारणाशिवाय बाळाला वारंवार दूध पाजल्याने त्याचा पोटात जास्त प्रमाणात दूध जाते.
५) फक्त एकाच स्तनातून स्तनपान
डॉ. पुनीत म्हणतात की, जर माता दरवेळी एकाच बाजूच्या स्तनातून दूध पाजत राहिल्या तर याने दुसऱ्या बाजूच्या स्तनातील दूध कमी होऊ शकते. एकाच वेळी दोन्ही स्तनांमधून आळीपाळीने दूध देणे चांगले.
स्तनपान हे केवळ बाळाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे नाही तर आईसाठी देखील फायदेशीर आहे. योग्य प्रकारे स्तनपान केल्यास बाळाचे वजन, रोगप्रतिकारक शक्ती आणि मानसिक विकास सुधारतो. म्हणून या 5 चुका टाळा.
(वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे, कोणतेही उपचार, उपाय करण्याआधी नेहमीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. )