Benefits Of Jamun Seed Powder For Health : जांभूळ हे भारतातील सर्वांत प्रसिद्ध फळांपैकी एक आहे. ते केवळ अतिशय ताजेतवानेच नाही, तर आवश्यक पोषक घटकांनीही परिपूर्ण आहे. उन्हाळ्यात आपण आंबे, फणसासोबतच गर्द जांभळ्या रंगाची जांभळेदेखील खातो. जांभळे घरोघरी हमखास मोठ्या आवडीने खाल्ली जातात. जांभूळ खाल्ल्यानंतर आपण शक्यतो त्याच्या बिया फेकून देतो. परंतु, या जांभळाच्या बिया आयुर्वेदात एक अत्यंत उपयुक्त व औषधी गुणधर्म असलेली आणि आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असलेली बी मानले जाते. जांभळाच्या फळाइतक्याच त्याच्या बियांनाही आरोग्यदायी महत्त्व आहे. जांभळाच्या बियांची पावडर ही अनेक आजारांवर घरगुती उपाय म्हणून वापरली जाते. पचनशक्ती वाढवण्यापासून ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यापर्यंत याचे जबरदस्त फायदे होतात. चला तर मग रिकाम्या पोटी जांभळांच्या बियांची पावडर घेण्याचे पाच आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊ…

रिकाम्या पोटी जांभळाच्या बियांची पावडर खाण्याचे ५ आश्चर्यकारक फायदे

१. रक्तातील साखरेची पातळी संतुलित करते- जांभळाच्या बियांची पावडर मधुमेहाने ग्रस्त असलेल्यांसाठी उत्तम मानली जाते. रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करणे आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारणे या दृष्टीने या पावडरचे खूप महत्त्व आहे. एशियन पॅसिफिक जर्नल ऑफ ट्रॉपिकल बायोमेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, जांभळाच्या बियांच्या अर्काने रक्तातील ग्लुकोजची पातळी लक्षणीयरीत्या कमी केली आहे, ज्यामुळे त्याच्या मधुमेहविरोधी गुणधर्मांना पाठिंबा मिळतो.

२. पचनशक्ती सुधारते – जर तुम्हाला अलीकडच्या काळात पचनाच्या समस्या येत असतील, तर जांभळाच्या बियांची पावडर खाणे फायदेशीर ठरू शकते. ते पचनसंस्थेसाठी इतके चांगले का आहे या दृष्टीने त्याकडे पाहिले, तर त्यात अ‍ॅस्ट्रिंजंट आणि कार्मिनेटिव्ह गुणधर्म आहेत, जे पचनसंस्थेला शांत करण्यासाठी ओळखले जातात. पोषणतज्ज्ञ ???न्मामी??? अग्रवाल स्पष्ट करतात की, सकाळी पहिल्यांदा ते खाल्ल्याने आतड्यांच्या हालचाली नियंत्रित होतात आणि पोटफुगी व आम्लता कमी होते.

३.. रोगप्रतिकार शक्ती वाढवते – जांभळाच्या बियांची पावडर खाण्याचा आणखी एक आश्चर्यकारक फायदा म्हणजे त्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते. राष्ट्रीय आरोग्य संस्था (NIH) नुसार, जांभळात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म भरपूर असतात, जे शरीराला हानिकारक मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करतात. एकदा तुम्ही नियमितपणे त्याची पावडर खाण्यास सुरुवात केली की, तुम्हाला लक्षात येईल की, आजारी पडण्याची वारंवारता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.

४. वजन कमी करण्यास मदत करते- वजन कमी करणे खूप आव्हानात्मक बाब असू शकते; परंतु जांभळाच्या बियांची पावडर खाणे हे काम सोपे करू शकते. त्यात उच्च फायबर सामग्री असल्याने, ती रिकाम्या पोटी खाल्ल्याने भूक कमी होण्यास आणि तृप्त होण्यास मदत होते. द इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटीनुसार, जांभळामुळे चरबी जमा होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

५. त्वचेचे आरोग्य सुधारते- जांभळात अँटीऑक्सिडंट्स आणि दाहकविरोधी गुणधर्म असल्याने, ते आपल्या त्वचेसाठीदेखील उत्तम आहे. हे गुणधर्म मुरमे, रंगद्रव्य व काळे डाग टाळण्यास मदत करतात, जे सर्व आपण टाळू इच्छितो. इतकेच नाही, तर त्याच्या पावडरचे सेवन केल्याने अकाली वृद्धत्व आणि त्वचा निस्तेज होणेदेखील टाळता येते. म्हणून जर तुम्हाला निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवायची असेल, तर जांभळाच्या बियांची पावडर खाण्यास सुरुवात करा.

जांभळाच्या बियांची पावडर घरी कशी बनवावी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जांभळाच्या बियांचा लगदा काढून टाकल्यानंतर त्या पूर्णपणे व्यवस्थित धुऊन घ्या. त्यांचा ओलावा पूर्णपणे जाईपर्यंत पाच ते सात दिवस त्या सूर्यप्रकाशात वाळवा. त्या मंद आचेवर हलक्याशा भाजून घ्या. मिक्सर किंवा ब्लेंडर वापरून, त्यांची बारीक पावडर बनवा आणि मग ती हवाबंद डब्यात थंड, कोरड्या जागी साठवा.