Fenugreek Seeds Benefits थंडीच्या दिवसात लोकांना सर्दी, खोकला, यांसारख्या समस्यांचा त्रास होऊ लागतो. यासोबतच हिवाळा ऋतू जवळ आला की आपली त्वचा आणि केस निस्तेज आणि निर्जीव होऊ लागतात. अशा परिस्थितीत रोज मेथीदाणे खाल्ल्यास या समस्यांपासून आराम मिळतो. मेथीमध्ये उष्ण प्रकृती असते जी शरीराला आतून उबदार ठेवते.याशिवाय मेथीमध्ये अँटिऑक्सिडंट्स देखील असतात जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात. जीवनसत्त्वे ए, सी, ई सह आवश्यक खनिजे मेथीच्या दाण्यांमध्ये आढळतात. हे सर्व घटक केस आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. चला तर याबद्दल जाणून घेऊ या
आजकाल अनेक साबण आणि शाम्पूमध्येही मेथीचा वापर केला जात आहे. तज्ञांच्या मते, एक चमचा मेथीमध्ये ६ ग्रॅम कार्बोहायड्रेट, ३ ग्रॅम फायबर, ३ ग्रॅम प्रथिने आणि १ ग्रॅम चरबी असते. मेथी हा आपल्या स्वयंपाकघरातील फायदेशीर मसाल्यांपैकी एक आहे. तुम्ही मेथी कोणत्याही स्वरूपात खाल्ल्यास तुम्हाला नेहमीच याचे फायदे मिळतात.
पचनासाठी फायदेशीर
मेथी आपली पचनसंस्था आणि पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करते. मेथीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते जे आपल्या पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. ज्यामुळे बद्धकोष्ठता सारख्या समस्या टाळता येतात. मेथी पाचक रसांचे स्राव वाढवते ज्यामुळे अन्न पचणे सोपे होते. त्यामुळे अॅसिडिटी, गॅस आणि अपचनाची समस्याही कमी होते.
केसांसाठी फायदेशीर
मेथीमुळे केस मजबूत होतात आणि ते तुटण्यापासून वाचतात.मेथीमध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, झिंक, मॅग्नेशियम आणि प्रोटीन यांसारखे अनेक पोषक घटक असतात जे केसांसाठी खूप फायदेशीर असतात. हे केस आतून निरोगी आणि मजबूत बनवतात. मेथीच्या रोजच्या वापरामुळे केस गळणे आणि कोंडा यासारख्या केसांशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. आणि नवीन केस वाढण्यास मदत होते.
हेही वाचा >> हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा का होतो? तज्ज्ञ सांगतात, थंडीच्या दिवसांत केसांची कशी घ्यावी काळजी ….
मासिक पाळी दरम्यान फायदेशीर
मेथीच्या दाण्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. जे मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास कमी करण्यास मदत करते. मासिक पाळीमध्ये प्रत्येक महिलेच्या पोटात दुखत असतं. अशी एकही महिला वा मुलगी नसेल जिच्या पोटात दुखत नसेल. अशा परिस्थितीत मेथीचे दाणे उपयोगी ठरतात. मेथीच्या दाण्याचे पाणी प्यायल्यास हे दुखणं बऱ्यापैकी कमी होतं. त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसात योग्य प्रमाणात हे पाणी प्यावं.