आजकाल चुकीच्या आहारामुळे, शारीरिक हालचालींचा अभाव आणि वाढत्या ताणामुळे वाईट कोलेस्ट्रॉलची समस्या झपाट्याने वाढत आहे. तळलेले पदार्थ, लाल मांस, प्रक्रिया केलेले स्नॅक्स आणि मिठाई यांचे जास्त सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. हे कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन प्लाक तयार होते आणि रक्तप्रवाहावर परिणाम करते. यामुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि उच्च रक्तदाबाचा धोका दुप्पट होतो. अशा परिस्थितीत, कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे. पण, आहार आणि जीवनशैलीत काही बदल करून कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते.

एमडी मेडिसिन डॉक्टर शालिनी सिंग साळुंके यांच्या मते, जर तुम्हाला वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रित करायचे असेल तर तुम्ही काही खास भाज्या खाव्यात. काही भाज्यांचे नियमित सेवन हे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी रामबाण उपाय आहे. या भाज्यांमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी घटक भरपूर असतात. त्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते. या भाज्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जवळजवळ शून्य असते आणि कॅलरीज देखील कमी असतात. यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि शरीर हलके वाटते.

कंटोळी (कर्टुल) – हृदयासाठी लाभदायक भाजी (Spiny Gourd for Heart Health)

कंटोळी (कर्टुल) ही अत्यंत पौष्टिक व फायदेशीर भाजी आहे. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं, जे शरीरातील अतिरक्त प्रमाणातील खराब कोलेस्ट्रॉल शोषलं जाण्याआधीच बाहेर टाकण्यास मदत करते. ही भाजी फॅट-फ्री आणि कमी कॅलरीयुक्त असल्याने हृदयासाठी उपयुक्त ठरते. कंटोळी (कर्टुल)मध्ये असलेले फ्लेवोनॉइड्स आणि अँटिऑक्सिडंट्स शरीरातील सूज कमी करतात, जी हृदयरोगाचं एक महत्त्वाचं कारण आहे. नियमित सेवनाने धमन्या स्वच्छ राहतात आणि रक्तप्रवाह सुधारतो.

भेंडी – कोलेस्ट्रॉल कमी करणारी आणि हृदयासाठी उपयुक्त भाजी (Lady’s Finger for Heart Health)

भेंडीमध्ये असलेलं पेक्टिन नावाचं रेशेदार तत्त्व खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास अत्यंत प्रभावी आहे. हे घटक रक्तातील कोलेस्ट्रॉलला बांधून शरीरातून बाहेर टाकतात. भेंडीला हृदयासाठी वरदान मानलं जातं, कारण यात अँटिऑक्सिडंट्स आणि अनेक सूक्ष्म पोषकतत्त्वं असतात. तसेच, भेंडी वजन नियंत्रणासाठीही उपयोगी आहे. तिच्या सेवनाने पोट पटकन भरतं आणि जास्त खाण्याची सवय कमी होते.

तोंडली – कोलेस्ट्रॉल कमी करणारी आणि वजन नियंत्रणासाठी उपयुक्त भाजी (Pointed Gourd for Cholesterol & Heart Health)

तोंडले आपल्या स्वयंपाकघरातील एक सर्वसामान्य भाजी असली, तरी तिचे गुण अतिशय विलक्षण आहेत. यात विरघळणारे फायबर मुबलक प्रमाणात असतं, जे कोलेस्ट्रॉलला बांधून शरीरातून बाहेर टाकण्यास मदत करतं. तोडल्यामध्ये स्वतःचं कोणतंही कोलेस्ट्रॉल नसतं आणि कॅलरी देखील अतिशय कमी असतात. त्यामुळे ही भाजी वजन वाढण्यापासून संरक्षण करते आणि हृदय निरोगी ठेवते. परवलमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट घटक रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक तयार होण्यापासून संरक्षण करतात.

भोपळा– रक्तदाब नियंत्रित करणारी व कोलेस्ट्रॉल कमी करणारी भाजी (Bottle Gourd for Cholesterol & Heart Health)

भोपळ्यात भरपूर पाणी आणि फायबर असतं. हे शरीरातील विषारी घटक (टॉक्सिन्स) बाहेर काढतं आणि रक्तवाहिन्यांमध्ये फॅट्स साचण्यापासून संरक्षण करतं. भोपळ्याचे नियमित सेवन केल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, हृदयाला हलकं वाटतं आणि शरीरातील सूज कमी होते. सकाळी भोपळ्याचा रस घेतल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि खराब कोलेस्ट्रॉल हळूहळू कमी होतो.

कारले – हृदयाचे रक्षण करणारी कडू भाजी (Bitter Gourd for Heart & Cholesterol Health)

कारल्याची चव कडू असली तरी त्याचे आरोग्यदायी फायदे अतिशय मौल्यवान आहेत. करेल्यामध्ये असलेले फायटोकेमिकल्स आणि विरघळणारे फायबर शरीरातील जास्त प्रमाणात असलेले कोलेस्ट्रॉल कमी करतात. यात असलेले अँटिऑक्सिडंट्स धमन्यांमधील सूज कमी करतात आणि रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवतात. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि हृदय अधिक निरोगी होतं.